लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तेराशे लोकसंख्येच्या विहिरगावात तीन हातपंप असून त्यापैकी दोन हातपंप निकामी झाल्याने संपूर्ण गाव एकाच हातपंपावर अवलंबून आहे. भुगर्भातील जलस्तर घसरल्याने या भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.लाखांदूर तालुक्यातील विहिरगाव ग्रामपंचायतीला आवळी, टेंभरी ही दोन गावे जोडण्यात आलेली असून या तिन्ही गावाची लोकसंख्या १,२५७ आहे. याठिकाणी हातपंपाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी सुविधा नाही. विहिरगाव येथे तीन, टेंभरी येथे चार तर आवळी येथे दोन हातपंप आहेत. तिन्ही गाव वैनगंगा नदी तिरावर वसलेले असतानाही हातपंपांना पाणी नाही.पावसाळा संपल्यानंतर नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे हातपंपांना पाणी नसते. आवळी हे गाव दोन नद्यांच्या मध्यभागी असून या गावाला बेटाचे स्वरूप येते. येथील हातपंपातून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरीक वर्षभर नदीचे पाणी पितात.मागीलवर्षी विहिरगाव आणी टेंभरी येथे सोलर पंप सुरू करण्यात आले होते. परंतु पाणी पुरत नसल्याने आता तेही बंद पडले आहेत. घरगुती वापराकरीता शेतातील विहीरीतून ट्रॅक्टरने पाणी आणावे लागत आहे. विहीरी कोरड्या पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. मागील तीन वर्षांपासून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे आवळी येथील नागरिकांचे जनजीवन धोक्यात आले आहे.मागील अनेक वषार्पासून गावात पाण्याची टंचाई भासत असून सन २००२ मध्ये तत्कालिन सरपंचा अनिता बगमारे यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. परंतु योजना सुरू झाली नाही. यागावातील नागरिकांच्या समस्या मांडूनही लोकप्रतिनिधींचे याकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.
शेतातून आणावे लागते पिण्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:10 PM
तेराशे लोकसंख्येच्या विहिरगावात तीन हातपंप असून त्यापैकी दोन हातपंप निकामी झाल्याने संपूर्ण गाव एकाच हातपंपावर अवलंबून आहे. भुगर्भातील जलस्तर घसरल्याने या भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देविहिरगाव, टेंभरी गावातील प्रकार : पाण्यासाठी महिला-पुरूषांची भटकंती