भंडारा शहरातील वॉर्डमध्ये हे गाणं अविरतपणे सर्वांनाच सकाळच्या सुमारास ऐकायला मिळते. कचरा गाडी आली की अनेक जण बाहेर निघून कचरा फेकायला तत्पर असतात. मात्र एखाद्याच्या घरासमोर गाडी येताच कचरा पेटीत टाकता टाकता खाली पसरला तर दुसऱ्याच्या घरासमोर कचरा पडला यातून वाद घडत असतो. गाडी चालकासोबत वाहकही असतो, अशा वेळी त्याने खाली पडलेला कचरा उचलला नाही तर दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण ऐकायला मिळत असते. भंडारा शहरातील एका वाॅर्डमध्ये असाच प्रकार चांगलाच विकोपाला गेला. ‘गाडीवाला आया घर से कचरा निकाल’ असे म्हणत गाडी तर आली; मात्र त्यानंतर पडलेल्या कचऱ्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून गाडीवाल्याने गाण्याचे रेकॉर्डिंग मोठ्या आवाजात करून तिथून जाण्यातच धन्यता मानली.
गाडीवाला आया घर से कचरा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:24 AM