लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मिनी ट्रक चालकाने वैनंगगेच्या मोठ्या पुलावरून नदी पात्रात उडी मारल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने बोटीद्वारे त्याचा शोध सुरु आहे. वृत्त लिहिस्तोसवर थांगपत्ता लागला नव्हता.प्रमोद देवचंद मोटघरे (२८) रा.नागेश्वर नगर पारडी, नागपूर असे मिनी ट्रक चालकाचे नाव आहे. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने आपला मिनी ट्रक भंडारा जवळील मोठ्या पुलावर थांबविला. चप्पल आणि मोबाईल पुलावर ठेवून काही कळायच्या आत नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार त्याच्या मागून आलेले त्याचे जावई चैतराम कळंबे रा.आंबाडी यांनी बघितला. त्यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिल्यावर दहा जणांच्या पथकाद्वारे बोटीतून शोध सुरु करण्यात आला. कोरंभी, पिंडकेपार पर्यंत सायंकाळपर्यंत शोध घेण्यात आला. परंतु प्रमोदचा थांगपत्ता लागला नाही.प्रमोद हा नागपूर येथील रहिवासी असून त्याची पत्नी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी भंडारा येथे सोमवारी आली होती. मंगळवारी तो आपल्या मिनी ट्रकने भंडारा येथे आला. त्यानंतर तो आपला मिनी ट्रक घेऊन वैनगंगेच्या पुलाकडे गेला आणि उडी घेतली.नाल्यात बैलगाडी वाहून गेलीलाखनी : तालुक्यातील सोनेखरी नाल्यात बैलगाडी वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मुलचंद दाजिबा धुर्वे रा.मेंढा हे आपली बैलगाडी नाल्यातून काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी अचानक पाण्याच्या प्रवाहाबरोबर बैलासह गाडी वाहून जाऊ लागली. समयसूचकता दाखवून मुलचंदने आपला जीव वाचविला. परंतु बैल आणि गाडी मात्र वाहून गेली. वृत लिहिस्तोवर बैलगाडीचा थांगपत्ता लागला नव्हता.
वैनगंगेच्या पुलावरून चालकाने मारली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:04 PM
मिनी ट्रक चालकाने वैनंगगेच्या मोठ्या पुलावरून नदी पात्रात उडी मारल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने बोटीद्वारे त्याचा शोध सुरु आहे. वृत्त लिहिस्तोसवर थांगपत्ता लागला नव्हता.
ठळक मुद्देभंडाऱ्यातील घटना : बोटीद्वारे शोध सुरू, सायंकाळपर्यंत थांगपत्ता नाही