सूरज गोंडाणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाकेश्वर : महाराष्ट्राची लोकवाहिनी एसटी बस आनंददायी आणि सुखकर प्रवासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र काही घटनांमुळे एसटीच्या नावलौकीकाला तडा जातो. आता एसटी सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने एसटीच्या अपघातविरहित सेवेवर मंथन सुरु असून अपघातमुक्त सेवेची जबाबदारी एसटी बस चालकांवर येऊन पडते. एसटीच्या लोकप्रियतेत वाढ करण्यासाठी चालक आणि वाहकच मुख्य भूमिका बजावू शकतात.राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा अभियान राबवित आहे. गत ७१ वर्षांपासून सुरक्षित सेवेच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या विश्वासाला तडे जाऊ नये यासाठी प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन तपासणी वाहनांची तांत्रिक दुरुस्ती आदी बाबींवर भर दिला जाणार आहे.अलिकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. चालक वाहकांच्या असभ्यपणाविषयी अनेक प्रकरणे दिसून येतात. कधी एसटीत वादाचे प्रसंगही घडतात. एसटीमहामंडळाच्या सेवेतील त्रृटी हा विषय ग्राहक कायद्यांतर्गत मोडतो. त्यामुळे त्याबाबत सामान्य प्रवाशांना माहित असणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहकाने नियोजित कामगिरी असताना त्यामागचे टप्पे व भाडेपत्रक जवळ ठेवणे गरजेचे आहे. बस स्वच्छ असणे आवश्यक आहे. तक्रार पुस्तिकाही बसमध्ये असण्याची गरज आहे.वृद्ध प्रवासी, गरोदर स्त्री, दिव्यांग व लहान मुलांना बसमध्ये चढण्या उतरण्यास मदत करणे अपेक्षित आहे. तसेच वाहकाने आपल्या शर्टवर नेमप्लेट लावणे गरजेचे आहे. परंतु या सर्व बाबींकडे कायम दुर्लक्ष होते. बसमध्ये धुम्रपान करणे आणि वाद्य वाजविण्यास सक्त मनाई आहे. परंतु मोबाईलवर अनेकदा गाणे वाजविले जातात. त्याचा सहप्रवाशांना त्रास होतो. अनेकदा वाहक सीव्हील ड्रेसवरच असतात. त्यामुळे तिकीट कुणाकडे मागावी असाही प्रश्न निर्माण होतो. या सर्व बाबींवर या सुरक्षा अभियानात मंथन होण्याची गरज आहे.प्रथमोपचार पेटी गायबएसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. अपघात झाल्यास तातडीने प्रथमोपचार करण्यासाठी ही पेटी लावली जाते. परंतु बहुतांश बसमध्ये आता प्रथमोपचार पेटी गायब झाल्याचे दिसून येते. यासोबतच बसमधील अग्नीप्रतिबंधक सिलिंडरही दिसेनासे झाले आहे. एखाद्यावेळेस अप्रिय घटना घडल्यास मोठा अनर्थ होवू शकतो. परंतु एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रथोपचार पेट्या व अग्निप्रतिबंधक यंत्रनेकडे लक्ष दिसत नाही. चालक आणि वाहक मात्र याबाबत बोलत नाही. महामंडळाने सुरक्षा अभियानांतर्गत या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.
अपघातमुक्त सेवेची जबाबदारी चालकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:00 AM
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा अभियान राबवित आहे. गत ७१ वर्षांपासून सुरक्षित सेवेच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या विश्वासाला तडे जाऊ नये यासाठी प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन तपासणी वाहनांची तांत्रिक दुरुस्ती आदी बाबींवर भर दिला जाणार आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । ११ ते २५ जानेवारीपर्यंत एसटी महामंडळाचे सुरक्षा अभियान