लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया बोरगाव खांबाडी या गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होती. मागील १० वर्षापासून येथील दारु विक्रेते या व्यवसायामुळे मालामाल झाले आहेत. याचा ज्येष्ठ नागरिक, महिला व किशोरवयीन मुलींना याचा त्रास व्हायचा. त्यामुळे संतप्त महिलांनी ही दारू पकडून पोलिसांच्या हवाली केली.या गावात दारुचे पाच दुकाने होती, दोन ठिकाणी सट्टापट्टी आणि जंगलातील एका गुप्त ठिकाणी जुगार भरत होता. त्यामुळे गावातील युवापिढी दारु सट्टा जुगारच्या आहारी गेले आणि यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. कित्येक ज्येष्ठ महिला पुरुषांनी याचा विरोध केला तर तेव्हाही विरोध पत्करावा लागला. गावातील शेकडो महिलांनी जीवाची पर्वा न करता गावातील अवैध व्यावसायिकाविरूद्ध पाऊल उचलताना अवैध व्यावसायीकांकडून धमक्या मिळाल्या. परंतु या गावातील महिलांनी जे करून दाखविले ते येथील पोलिसांना सुद्धा कधी जमलेच नव्हते. अवैध व्यवसाय लहानशा गावात वाढला कसा? असे म्हणतात की या ठिकाणी आजूबाजूच्या १२ गावातील ग्रामस्थांचा सकाळ संध्याकाळी वावर दिसायचा. येथील व्यावसायिक खुलेआम व्यवसाय करायचे. कुणाला काय बोलायचे आणि कसे बोलायचे याच प्रश्नात येथील महिला ग्रामस्थ राहायचे पण म्हणतात ना अती तेथे माती. आणि तो दिवस सोनियाचा उजाडला. सर्व महिलांनी आपल्या संसाराविषयी, आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी कधी तरी कठोर पाऊले उचलावी लागणार याचे भान ठेवून आता नाही तर कधीच नाही असा विचार केला आणि गावातील काही पुरुष व महिलांनी शेकडोंच्या संख्येने अड्याळ पोलीस ठाणे गाठले. ग्रामस्थांनी तक्रार दिल्यानंतर गावातील व्यवसाय बंद का होत नाही म्हणून येथील महिलांनी दारुविक्रेत्यांची दारु पकडायला सुरुवात केली. त्यानंतर गावात अवैध व्यवसाय बंद मात्रा गावालगतच्या जंगलात हेच धंदे सुरु असल्याची गुप्त माहिती महिलांना प्राप्त होताच महिलांनी कुणाचीही वाट न पाहता १४ पेट्या दारुच्या पकडल्या आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. गावातील अवैध व्यवसाय बंद झाल्यामुळे गावात आता शांतता पसरली आहे.
बोरगाव येथे महिलांनी पकडला दारुसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:20 PM