आरोग्य अधिकारी अनभिज्ञ : तुमसर-रामटेक मार्गावरील प्रकारमोहन भोयर। लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र तथा राज्य शासन गरीब व गरजुंना मोफत उपचार करुन औषधाचा पुरवठा करते. पंरतु नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गरजूंना औषधे मिळत नाही. उलटी ती औषधे फेकली जातात. तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील खापा (तु) शिवारात शासकीय पुरवठ्याची हजारो रुपयांची औषधे फेकली आहेत. ही औषधी का फेकण्यात आली? कुणी फेकली? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.तुमसर-रामटेके राज्य महामार्गावर खापा शिवारात रस्त्याच्या कडेला ‘नॉट फॉर सेल फॉर गर्व्हनमेंट सप्लाय’ शासकीय पूरवठ्याची हजारो रुपयाची औषधी फेकलेली आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांचे या औषधांकडे लक्ष जाऊन ते थांबतात. कुतुहलाने औषधांकडे बघून तिथून निघून जातात. ही औषधे सध्या तुमसर व परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ही औषधे सुमारे १० ते १५ दिवसांपूर्वी फेकल्याचे समजते. खड्यावजा जागेत ही औषधे फेकली असून औषधांवर बांभूळाची काटेरी फांदीे झाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.काचेच्या व प्लॉस्टीक बॉटलाचा समावेश असून त्या औषधांनी भरल्या आहेत. हे विशेष. बॉटल्स्वर ‘नॉट फॉर सेल’ असे लिहीले आहे. ही औषधे शासकीय रुग्णालयात पूरविली गेली असावीत असा अंदाज आहे. तुमसर-रामटेक मार्गावर कुठेच शासकीय रुग्णालय नाहीत. तुमसर शहरात व पंचायत समिती अंतर्गत शासकीय रुग्णालयात शासन निश्चितच औषधांचा पुरवठा करते. तुमसर पंचायत समिती कार्यालयात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत ही काही औषध व साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राना पुरविली जातात असे समजते.ही औषधे कुणी आणून फेकली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नॉट फॉर सेल नमूद औषधं शासकीय रुगणालयांना पुरवठा केलेली आहेत. औषधंच्या बॉटल्सवर ‘नॉट फॉर सेल, फॉर गव्हर्नमेंट सप्लाय’ असे नमूद केले आहे, हे विशेष. या औषधात लसींचाही समावेश आहे.ही औषधे कालबाह्य झाली कशी हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो. नियमानुसार कालबाह्य तथा अतिरिक्त औषधे शासनालाच परत करावी लागतात. तसा, तपशिल व अहवाल संबंधित शासकीय कार्यालयात राहतो ही औषधे नेमकी कुठली आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. अतिरिक्त औषधांचा पुरवठा आरोग्य विभागाने कसा केला हा मुख्य प्रश्न आहे.सध्या शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांचा साठा याची आॅनलाईन माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागते. फेकलेल्या औषधांचा साठा लावण्याची तसदी वरिष्ठ आरोग्य अधिकारी घेतील काय? हा मुख्य प्रश्न आहे. फेकलेली औषधे कुणी खाल्ली की गूरांनी चघळली तर त्याचे निश्चितच दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाने या औषधांची विल्हेवाट लावण्याची गरज आहे.फेकलेली औषधीबाबत आपणास माहिती नाही. या औषधीची माहिती जाणून घेतल्यानंतरच काही सांगता येईल. मात्र या औषधांचा आमच्या विभागाशी काहीही संबंध नाही.- डॉ. एम. ए. कुरैशी, तालुका आरोग्य अधिकारी पं.स. तुमसरफेकलेल्या औषधांची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यावर सांगता येईल. औषधे फेकता येत नाही. सध्या औषधांची आॅनलाईन माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागते. औषधांच्या साठयामधून औषधांचा हिशोब चोख ठेवावा लागतो. चौकशीनंतर सत्य काय ते बाहेर येईल.- डॉ. सचिन बाळबुध्दे, अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, तुमसर
रस्त्याशेजारी फेकली हजारो रुपयांचे औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:20 AM