शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

इसमाच्या सतर्कतेमुळे भामट्यांचा डाव फसला

By admin | Published: July 31, 2015 12:59 AM

बँकेबाहरे मोटारसायकल ठेवून खात्यातून रक्कम काढण्याकरिता एक इसम बँकेत गेले. चार भामट्यांनी मोटारसायकलचा प्लग काढून ठेवला.

तुमसर : बँकेबाहरे मोटारसायकल ठेवून खात्यातून रक्कम काढण्याकरिता एक इसम बँकेत गेले. चार भामट्यांनी मोटारसायकलचा प्लग काढून ठेवला. इसम मोटारसायकल सुरू करण्याच्या प्रयत्नात त्याला लुबाडण्याचा कट भामट्यांनी रचला होता. इसम तथा उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेने त्या भामट्यांचा प्रयत्न फसला. या भामट्यांचा सध्या तुमसर पोलीस शोध घेत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी २ वाजता शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर घडली.राजेश नंदलाल उपरीकर रा. शिवाजीनगर तुमसर मजुरांची मजूरी देण्याकरिता शहरातील भारतीय स्टेट बँकेत दुपारी २ च्या सुमारास खात्यातून रक्कम काढण्याकरिता गेले. मोटारसायकल बाहेर ठेवून उपरीकर यांनी बँकेत प्रवेश केला. त्यांच्या मागावर चार भामटे बँकेबाहेर बसले होते. दरम्यान उपरीकर यांच्या मोटारसायकलचा प्लग चार भामट्यांनी काढून ठेवला. उपरीकर रक्कम घेवून बँकेबाहेर पडले. मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकल दोन ते तीन प्रयत्नात सुरू झाली नाही. उपरीकर यांच्या चाणाक्ष बुद्धीने ते हेरले उपस्थित दोन ते तीन नागरिकांनी त्यांना याबबत सूचना केली. उपरीकर यांच्या आजूबाजूला चार युवकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. उपरीकर सरळ पुन्हा बँकेत परतले. त्यांनी याबाबत व्यवस्थापकांशी संपर्क साधून सांगितले बँकेतूनच उपरीकर यांनी पोलीस निरीक्षक किशोर गवई यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. गवई यांनी तात्काळ पोलिसांना बँकेत पाठविले. बँकेत गेलेला इसम परत का येत नाही याची चाहूल चार भामट्यांना लागण्यास वेळ लागला नाही. चारही भामटे नंतर पसार झाले. मोटारसायकलजवळ संशयास्पद स्थितीने हालचाल करतानी चार युवक बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहेत, परंतु त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, अशी माहिती आहे. देहबोलीतून पोलिसांना त्याचा शोध करावा लागेल. (तालुका प्रतिनिधी)