शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

बेंचेसमुळे गोरेगावच्या सौंदर्यात भर

By admin | Published: April 06, 2017 12:23 AM

येणारा उद्या अधिक उत्तम असावा, या विचाराला साकार करण्यासाठी गोरेगाव येथील गायत्री परिवार पुढे सरसावला आहे.

लोकसहभागातून बैठक व्यवस्था : गायत्री परिवाराचा उल्लेखनीय उपक्रमगोरेगाव : येणारा उद्या अधिक उत्तम असावा, या विचाराला साकार करण्यासाठी गोरेगाव येथील गायत्री परिवार पुढे सरसावला आहे. त्या अंतर्गत स्वच्छता व जलस्त्रोतांचे शुद्धीकरण तथा सौंदर्यीकरणाचे कार्य केले जात आहे. यात स्थानिक लोकांच्या सहकार्याने २० सिमेंट (गार्डन) बेंचची सोय शहरात ठिकठिकाणी करण्यात आली आहे.यात १५ बेंचेस पवन तलाव परिसरात, दोन बेंचेस गोरोबा काका मंदिर प्रभाग-१४, एक बेंच बाजार चौक गोरेगाव व एक बेंच रविदास स्मारक प्रभाग-९ मध्ये लावण्यात आला. विशेष म्हणजे जवळपास ५० हजार रूपये किमतीचे हे बेंचेस विना शासकीय मदतीने लोकांनी दिलेल्या दानातून लावण्यात आले. पवन तलाव परिसर आतापर्यंत केरकचऱ्याचे माहेरघर म्हणून परिवर्तीत होत होते. तेथे मागील १ जानेवारी २०१७ पासून गायत्री परिवार, दिया संघटना व युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी आपली वेळ देवून स्वच्छतेचे कार्य केले जात आहे.अभियंता आशीष बारेवार यांनी सांगितले की, शहरात एकही बालोद्यान नसल्याची तक्रार नागरिक अनेक दिवसांपासून करीत होते. ही समस्या आता काही दिवसातच संपुष्ठात येण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच भविष्यात याला आणखी विकसित करण्याची योजना आहे. सदर कार्य लोकसहभागातून करण्यामागे काही हेतू असल्याचे ते म्हणाले. लोकसहभागामुळे लोकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे या जागेची देखभाल योग्यरित्या होवू शकेल, असे त्यांनी सांगितले. सिमेंट बेंच दानदात्यांमध्ये आशीष बारेवार, नितीन बारेवार, राहुल कटरे, अरविंद जायस्वाल, रूस्तम येडे, पांडुरंग साखरवाडे, जैन रिसोर्ट गोरेगाव, योगेश बारेवार, हितेश बिसेन, गोपाल हत्तीमारे, सम्मू परिवार, टीटू जैन, विवेक देशमुख, अनिकेत बघेले, मयूर कोरेकर, मार्कंडराव वैद्य, जितेंद्र बिसेन, पवन सोनवाने, शशीकला बागडकर यांचा समावेश आहे.सर्व दानदात्यांचा तथा सर्व स्वच्छता अभियानात सहभाग देणाऱ्यांचा पुरूषोत्तम साकुरे, भाऊलाल गौतम, संजय बारेवार, संजय घासले व गायत्री महिला मंडळाने आभार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)