शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

बुध्द धम्मामुळे जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 12:59 AM

बौध्द धम्म हा आचरणाचा धम्म आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होतो. स्वत:चा मार्ग शोधतो.

भिक्खु संघाचे प्रतिपादन : आलेबेदर येथे बौद्ध धम्म परिषद साकोली : बौध्द धम्म हा आचरणाचा धम्म आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होतो. स्वत:चा मार्ग शोधतो. त्यामुळे स्वत:ची दिशा गवसायला लागते. देशातील दलित समाज अंधारात पडलेला होता. परंतु भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपले जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे जायला लागला. माणुस स्वाभिमानी बनत चालला. भंते प्रज्ञाज्योती यांनी या स्थळावरुन बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार केला. त्यामुळे बौध्द स्थळ म्हणुन नावारुपास येत आहे, असे प्रतिपादन बौध्द भिक्खुनी आलेबेदर येथे आयोजित दोन दिवसीय बौध्द धम्म परिषदेत व्यक्त केले.याप्रसंगी भदंत सदानंद महास्थविर केळझर, भदंत सत्यशिल महाथेरो, भदंत धम्मदिप महाथेरो, भदंत अनिरुध्द महाथेरो, भदंत महापंथजी महाथेरो, भंदत कृपाशरण महास्थविर, भदंत नागदीपकर, भदंत संघानंद महास्थवीर, भदंत प्रियदर्शी महास्थवीर, भदंत शिलधन महास्थवीर, भदंत बुध्दघोष महास्थवीर, डॉ. भदंत धम्मसेवक महास्थवीर, भदंत ज्ञानबोधी, भदंत शिलवंश, भदंत सुगतबोधी, भदंत संघधातु, भदंत महानागरत्न, भदंत विनय बोधीप्रिय थेरो व अन्य ५० भिक्खु उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, जिल्हा परिषद सदस्या रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, चुन्नीलाल वासनिक, सडक अर्जुनी बाजार समितीचे संचालक रोशन बडोले, डी. जी. रंगारी यांनी भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीत कसा रुजविता येईल व प्रत्येक व्यक्तीला चांगले संस्कार कसे होतील याविषयी माहिती देण्यात आली. होळी पौर्णिमेच्या दिवशी लोकांना व्यसनापासून कसे परावृत्त करता येईल यावरही विचार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी बुध्द भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये मनोज कोटांगले, सुभाष कोठारे, संविधान भारती, भिमेश भारती, स्नेहा वानखेडे, सुर्यकांता पाटील, जोशील मून, अश्विनी राजगुरु यांनी गितातुन गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले. दोन दिवशीय धम्मकुटी आलेबेदर येथे रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन खांबा उपकेंद्रतर्फे करण्यात आले. त्यामध्ये डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे व त्यांची टिम यांनी परिश्रम घेतले. उपासकांनी औषधांचा लाभ घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, महासचिव एम. आर. राऊत, गजेंद्र गजभिये यांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पडली. कार्यक्रमासाठी नंद, धम्मज्योती, संघज्योती, जिवनज्योती, नागसेन, आनंद, अनिरुध्द, दीपक मेश्राम, डी. जी. रंगारी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)