व्यंकटेश नगरातील आदर्श : हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांनी दिला समाजाला आदर्श प्रशांत देसाई भंडारातुळसीचे पान, एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी माऊली नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचेन लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळशीसीयोगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाहीअशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दशर्नाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्त्व आहे.तुळशीमध्ये कार्बन डायआॅक्साईड शोषून घेऊन आॅक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. तुळशी विवाह एका पुजोत्सव हरीविष्णूचा तुळशीशी विवाह लावणे असा याची विधी आहे. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन सारून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस व झेंडूची फुलांची झाडे उभी करतात. तुळशीच्या मुळाशी चिंचा व आवळे ठेवतात. तुळशी विवाह कार्तिकी एकादिवशी पासून पौणिर्मेपर्यंत कोणत्याही दिवशी करावा त्यात उत्तरा भाद्रपद, रेवती व अश्विनी ही नक्षत्रे तुळशी विवाहाला श्रेष्ठ मानण्यात आले आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह झाल्या नंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांच समाप्ती करतात. व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग स्वत: सेवन करतात. तुळशी ?ही घरोघरी असणारी एक अत्यंत पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबीयांच्या घरासमोर वृंदावन असते. आजकाल जागेअभावी वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीचे रोप लावतात. तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला हिरप्रिया म्हणतात. समाजात द्वेषभावनेतून वाद विकोपाला गेल्याचे अनेक उदाहरण नित्याने बघायला मिळतात. अशा परिस्थितीत भंडारा शहरातील भोजापूर परिसरात असलेल्या व्यंकटेश नगरातील कुटुंबियांनी समाजासमोर धर्मनिरपेक्षतेचा एक नवा पायंडा घातला आहे. तीस कुटुंबांची वसाहत असलेल्या या व्यंकटेश नगरात २६ कुटुंबातील सुमारे १०० व्यक्ती मोठ्या गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. या वसाहतीत बौद्ध, ढिवर, ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू बांधव वास्तव्य करीत असले तरी त्यांच्यात कधीही हेवेदावे किंवा भांडणतंटे बघायला मिळत नाही. कोणत्याही समाजाचा सण असो, सर्व कुटुंब एका कुटुंबासारखे एकत्र येऊन सण उत्सव आनंदात साजरे करतात. दिवाळी असो किंवा होळी. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा ईद. ख्रिसमस असो किंवा ढिवर बांधवांचा रक्षाबंधन (भुजली) असो. या सर्व बांधवांचे सण उत्सव येथे मोठ्या आनंदात साजरे करतात. प्रत्येकांच्या कार्यक्रमासाठी सढळ हाताने देणगीही देण्यात वसाहतीतील नागरिक मागेपुढे बघत नाही. अशा या आदर्शवत व्यंकटेश नगरवासीयांनी मागील दोन वर्षांपासून सामूहिक तुळशीविवाहाची परंपरा सुरु केली आहे. ती यावर्षीही त्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. तत्पूर्वी वसाहतवासीयांनी सामूहिक देणगीतून येथे श्री बालाजी व्यंकटेश्वर मंदिराची उभारणी करून मूर्तीची विधीवत स्थापना केली. व्यंकटेश्वराच्या साक्षीने सोमवारला सर्व कुटुंबियांनी त्यांच्या घरातील तुळशींचा सामूहिक विवाह लावला. केवळ हिंदू बांधवच तुळशीविवाह करतात किंवा त्यात सहभागी होतात. अशी धारणा आजपर्यंत बघायला मिळते. मात्र व्यंकटेशनगरातील ख्रिश्चन व मुस्लिम कुटुंबियांनीही या विवाह सोहळ्यात हिरहिरीने सहभाग घेऊन तो यशस्वी करण्यास मोलाचा वाटा उचलला. व्यंकटेशनगरवासीयांनी धर्मनिरपेक्षतेचा दिलेला संदेश खरोखरच आदर्शवत आहे.या महिलांनी घेतला पुढाकारतुळशीचा सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करण्याकरिता अर्चना गडपायले, आयशा सिद्धीकी, सोनीलता विल्यम, कल्पना कलाने, अल्का कलाने, अनिता कोडापे, नवनिता श्रीवास्तव, चंदा मुलकलवार, नूतन माने, अंजली रहांगडाले, राजश्री मेश्राम, वर्षा निपाने, मिनाक्षी शहारे, माला सिंदीमेश्राम, शिला लिमजे, मैथीली डोनेकर, ममता हर्देनिया आदींनी पुढाकार घेतला.
सामूहिक तुळशी विवाहातून घडले धर्मनिरपेक्षतेचे दर्शन
By admin | Published: November 16, 2016 12:40 AM