लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यात सर्रास रेतीचे नियमबाह्य खनन केले जाते. त्याचा प्रत्यय शनिवारी देवनारा येथे एका पर्यवेक्षकाच्या मृत्यूमुळे समोर आला. आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या एका पर्यवेक्षकाचा नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यात फसल्याने दुर्देवी मृत्यू झाला. हा पर्यवेक्षक देवनारा येथे रेती घाटावर मजूर म्हणून कामावर होता. मृत पर्यवेक्षकाचे नाव बबन बाबूराव चोपकर (३५) रा.विनोबा नगर, तुमसर असे आहे.शनिवारी बबन चोपकर आपल्या ५ ते ६ मजूर मित्रांसोबत बावनथडी नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला. १५ ते २० मिनिटे सर्वांनी नदीपात्रात आंघोळ केली. इतर मजूर आंघोळ आटोपून काठावर आले. बबन याने मित्रांना तुम्ही जाऊन स्वयंपाक करा मी नंतर येतो असे सांगितले. इतर सर्व मजूर नदीपात्रातून परत गेले. १५ ते २० मिनिटानंतर बबन अजूनपर्यंत परत का आला नाही म्हणून २ ते ३ मजूर नदीपात्राकडे गेले. त्यांना बबन नदीपात्रात दिसला नाही. त्याचे कपडे काठावर मात्र होते. त्यांना शंका आली. नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांना आरडाओरड करून त्यांनी जमा केले.नदीपात्रात बबनचा शोध सुरु केला. काही वेळानंतर बबन एका खड्ड्यात फसलेला त्यांना आढळला. त्याला बाहेर काढण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनाकरिता त्याचे प्रेत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस चौकशी सुरु आहे. बबन हा आठवड्यापासून दोनदा तुमसर येथे घरी येत होता. आज बबन घरी परत येणार होता. त्यामुळे त्याची प्रतीक्षा कुटुंबिय करीत होते. बबनचे कुटुंब आता वाºयावर आले आहे. कुटुंबियांना माहिती होताच त्यांनी हंबरडा फोडला.बावनथडी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. येथील रेतीघाट महसूल प्रशासनाने लिलाव केला असून सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याची मदत आहे. रेती उत्खननामुळे येथील नदीपात्रात सहा ते सात फुटाचे खोल खड्डे पडले आहेत. रेती उत्खननाच्या नावावर बबन चोपकर कार्यरत होता. महसूल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संपूर्ण नदीपात्र खड्डेमय झाले आहे. खनिकर्म व महसूल विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे.
नदीपात्रातील खड्ड्यात फसल्याने पर्यवेक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:20 PM
तुमसर तालुक्यात सर्रास रेतीचे नियमबाह्य खनन केले जाते. त्याचा प्रत्यय शनिवारी देवनारा येथे एका पर्यवेक्षकाच्या मृत्यूमुळे समोर आला. आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या एका पर्यवेक्षकाचा नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यात फसल्याने दुर्देवी मृत्यू झाला. हा पर्यवेक्षक देवनारा येथे रेती घाटावर मजूर म्हणून कामावर होता. मृत पर्यवेक्षकाचे नाव बबन बाबूराव चोपकर (३५) रा.विनोबा नगर, तुमसर असे आहे.
ठळक मुद्देदेवनारा येथील घटना : नदीपात्रातील मोठे खड्डे धोकादायक, महसूल व खनीकर्म विभागाचे दुर्लक्ष