शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:07 AM

सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे.

ठळक मुद्देपाऊस मुबलक बरसेना : बाजारपेठेतील उलाढाल असमाधानकारक, उत्साह कमी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्जा-राजाचा सण म्हणून ओळखला जाणाºया पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निसर्गाचा अवकृपा यावर्षी बळीराजाचे टेंशन वाढवित आहे. बैलांचा साज घ्यायलाही पैसा नसल्याने सणाच्या तोंडावरही बाजारात समाधानकारक उलाढाल झालेली नाही.बळीराजाचा खरा मित्र अशी ओळख म्हणून सण पोळा हा साजरा केला जातो. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात बैलांच्या पोळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र सततची नापिकी व पावसाची पाठ या दोन बाबींमुळे पोळा सणावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसुन येत आहे. याउपरही जीएसटीमुळे बैलांचा साज घेणाºया साहित्यांमध्ये वाढ झाल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत आहे. सण साजरा करायचाच पण पैशाविना कसा असा प्रश्न तो स्वत:लाच विचारित आहे.जिल्ह्यात बºयाच ठिकाणी मोठा पोळा भरविला जातो. मात्र पुर्वीपेक्षा बैल जोड्यांची संख्या कमी झाल्याने पोळा भरणाºया ठिकाणी मनोरंजनात्मक साहित्य जास्त व बैल जोड्यांची संख्या कमी असे दृष्य दिसून येत आहे.बैलांचा साज महागलामागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठेत उलाढाल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. बैलांचा साज घेण्यात येणाºया साहित्यांमध्ये येसण ५० रुपये जोडी, चौरंग ४० रुपये जोडी, बैलांचा ढुल १३५० ते २००० रुपये जोडी, मटाटी ४० रुपये जोडी, माला १०० रुपये जोडी, पेंट ३० रुपये (५० ग्रॅम), रंग-बेगड १० रुपये, गोप ५ रुपये, कासरा १०० रुपये जोडी, मोरखी १०० रुपये जोडी या भावाने साहित्य मिळत आहेत. हेच साहित्य मागील वर्षी कमी दरात उपलब्ध होते. अपेक्षेनुरुप पाऊस न बरसल्याने शेतात पेरलेले धान्यही उगवले नाही. कुठे उगवले तर रोवणीसाठी पाणी नाही. अशा दुविधा स्थितीत सापडलेल्या बळीराजासमोर आर्थिक चणचण असतांना पोळा सण साजरा तरी कसा करावा असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतही समाधानकारक उलाढाल होत नसल्याची प्रतिक्रिया बैलांचा साज विकणारे शब्बीर खान यांनी दिली. पोळा सण असतानाही या व्यवसायात घट दिसून आल्याचीही म्हणण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदीदारांची संख्या कमी आहे. दुसरीकडे बैलजोड्यांची संख्याही घटत असल्याने ही समस्या वाढली आहे. पैशाअभावी बैलांच्या सजावटीकरिता लागणाºया खरेदीबाबतही शेतकºयांनी हात आखडता घेतला आहे.संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी राजकारण बाजूला सोडून सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची व शासन दरबारी व्यथा मांडण्याची शक्यता आहे. अधिकाºयानीही उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार न करता नियोजन व प्रत्यक्ष चौकशीचे निर्देश देण्याची आवश्यकता आहे. करीडी परिसरात मंगळवारला काही कालावधीसाठी दमदार पाऊस झाला असला तरी पावसाचे पाणी शेतीला पडलेल्या भेगांमध्ये जिरले आहे.उमेश तुमसरे शेतकरी पालोरा