समस्या : आता खोलीकरणासाठी हेक्टरी ५० हजारांची तरतूदसंजय साठवणे साकोलीतलावाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख असली तरी तलावांची अवस्था बिकट होत चालली आहे. परिणामी तलावांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. अतिक्रमण व तलावातील गाळामुळे पुर्वी हजारो हेक्टर शेतीला सिंचन करणारी तलाव आजघडीला देखावे ठरले आहेत. या तलावांना नवसंजिवनी देण्यासाठी राज्य सरकारने आता या तलावाचे खोलीकरण, गाळ उपसणे यावर हेक्टरी ५० हजार रुपये खर्चाची तरतुद केली आहे. असे असले तरी तलावाचे मूळ क्षेत्रफळाचाही विचार होणे आवश्यक झाले आहे.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तलाव दुरुस्तीची घोषणा करुन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. या तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची तरतुद करुन दिलासा दिलासा आहे. भंडारा जिल्ह्यात आजघडीला १,१५४ मामा तलाव असुन भंडारा तालुक्यात १२४, मोहाडी तालुक्यात ७३, तुमसर तालुक्यात २०३, पवनी तालुक्यात १८६, साकोली तालुक्यात २४९, लाखनी तालुक्यात १९३ व लाखांदूर तालुक्यात १२६ तलावांची नोंद आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या मामा तलावांची सिंचनक्षमता २४,३३५ हेक्टर एवढी आहे. पंरतु, तलावातील वाढते अतिक्रमण व दुरुस्तीअभावी ही सिंचन क्षमता निम्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियानाला प्राधान्यक्रम दिला आहे. दुष्काळीस्थिती बघता शेतीसाठी सिंचन संवदेनशिल विषय बनला आहे. निसर्ग साथ देत नसल्यामुळे तलावाची स्थिती दयनीय झाली आहे. तलाव दुरुस्तीसाठी हेक्टरी किमान ७० ते ८० हजार रुपये निधीची गरज असून तलावांच्या जागेत वाढते अतिक्रमण समस्या जटील बनली असून तलावातील अतिक्रमण काढून खोलीकरण केल्यास सिंचन क्षमता वाढू शकते पर्यायाने मासेमारीसाठी तलावाचा उपयोगी ठरु शकतात.
अतिक्रमणामुळे तलावांची सिंचनक्षमता घटली
By admin | Published: September 26, 2015 12:32 AM