करडी, पालोरा, देव्हाडा, खडकी परिसरात मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी कर्ज काढून धानाची धडाक्यात पेरणी केली. आत कोसळलेल्या पावसाने सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली. दरम्यान १५ दिवस पाऊस बेपत्ता राहिला. त्यानंतर पाऊस झाल्याने पुन्हा रोवणीला वेग आला. लोटाचे पाणी साचलेल्या कोरडवाहू शेतीत रोवणीला प्रारंभ झाला. मात्र, पुन्हा त्यानंतरचे दोन नक्षत्र कोरडे राहिल्याने परिस्थिती बिकट झाली. मामा तलाव, बोड्या व नाल्यात साचलेल्या पाण्याचा उपसा करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रोवणी आटोपण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यासाठी आर्थिक बडा सहन करावा लागला. यात कोरडवाहू शेतकऱ्याची पार वाट लागली. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पेरणीला होऊन रोवणे झालेले नसल्याने आता रोवणी करावी की नाही? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
180821\img-20210814-wa0124.jpg~180821\img_20210816_135502.jpg
पर्याप्त पावसाअभावी १० टक्के रोवण्या रखडल्या~पर्याप्त पावसाअभावी १० टक्के रोवण्या रखडल्या