चांदपूर देवस्थानची व्यथा : ०.१५ हेक्टर आर जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव चुल्हाड (सिहोरा) : भाविकांचे आरोग्य व श्रध्दास्थान असलेल्या चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात प्रस्तावित जागेच्या हस्तांतरणअभावी विकास खुंटला आहे. जागा हस्तांतरणाचा सर्वेक्षण झाला असतांना अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती मिळाली आहे.सातपुडा पर्वत रांगाच्या उंच टेकडीवर गत वैभव लाभलेला चांदपुर येथील जागृत देवस्थान भक्त भाविकांचे आराध्य व श्रध्दा स्थान आहे. वनविभागाच्या राखीव व अखत्यारीत जंगलात या देवस्थानाचा परिसर आहे. याचे देवस्थान लगतचा परिसर ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटने स्थळापर्यंत विस्तारित आहे. परंतु जागृत हनुमान देवस्थान परिसरात अधिकृत जागेचा हस्तांतरण झाला असल्याने विकासाला ब्रेक बसला आहे. देवस्थान ट्रस्टला विकास करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. देवस्थान परिसरात बागबगीचा, विश्रांती स्थळ, अशा अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी भाविकांचे आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु हस्तांतरीत जागा उपलब्ध नसल्याने विकास रखडला आहे. देवस्थानच्यावतीने जागा हस्तांतरीत झाली. प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात १५ हेक्टरहून अधिक जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रस्ताव सादर करण्याचे वन विभागाने सहकार्याची भुमिका घेतली आहे. या विभागामार्फत जागा हस्तांतरणासाठी सर्वेक्षण करण्यात आला असून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. अशी माहिती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासन तथा लोकप्रतिनिधीच्या विकास निधी अंतर्गत विकास कार्यासाठी निधी मंजुर करण्यात येत आहे. परंतु हा निधी वन विभागाच्या नोंद असणाऱ्या जागेत खर्च करता येत नाही. यामुळे निधी परतीच्या वाटेवर येत आहे. देवस्थान परिसरात असणाऱ्या जागेत ट्रस्ट मार्फत विकास कार्याना गती देण्यात आली आहे. देवस्थानात विकास कार्य अंतिम टप्प्यात आहे. अन्य जागेत चिल्ड्रन पार्क उभारण्यात आला आहे. . परंतु अन्य परिसरात विकास विस्तारित करता येत नाही. जागा हस्तांतरित करण्यासाठी देवस्थानच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु शासन अंतर्गत असंख्य भाविकांना दिलासा देणारी माहिती मिळाली नाही. या देवस्थानात मुख्य समस्या पार्र्किंगची आहे. जागेअभावी रस्त्यावरच वाहने उभी करण्यात येत आहेत. यामुळे भाविकांची जयंती उत्सवात गैरसोय होत आहे. वर्षभरात अनेक जयंती उत्सव तथा निरंतर भाविकांची रेलचेल राहत असल्याने पार्र्किंगची समस्या नित्याचीच आहे. गर्दीच्या ठिकाणी व देवस्थान परिसरात अप्रिय घटना घटण्यासाठी शासन स्तरावर जलद गतीने निर्णय घेण्यात येत असले तरी हनुमान देवस्थान संदर्भात जागेची समस्या निकाली काढणारा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे कोट्यवधी खर्चाच्या कृती आराखड्यावर अमलबजावणी शुन्य आहे. शासाने तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे.याच देवस्थान परिसर लगत ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळाचा विस्तारित परिसर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून या माहितीची चर्चा आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनापासून इक्को टुरिझम अंतर्गत चांदपुर पर्यटन स्थळाचा विकास होणार असल्याची माहिती नागरिकांच्या कानावर आली आहे. परंतु तब्बल वर्षभर विकास कार्याच्या हालचालिंना वेग देण्यात येत नाही. दोन वर्षापासून पर्यटनस्थळात स्थिती जैसे थे आहे. २००२ पासून पर्यटन स्थळ बंद आहे. विकास शुन्य आहे. यामुळे अन्य विकास कार्य प्रभावित झाली आहेत. पर्यटन स्थळ बंद असल्याने देवस्थान परिसरात असणारे व्यवसाय अडचणीत आली आहेत. पर्यटन स्थळाच्या विकासाची प्रतिक्षा सिहोरा वासिायांना आहे. (वार्ताहर)
जागेच्या हस्तांतरणअभावी विकास खुंटला
By admin | Published: January 13, 2017 12:22 AM