लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : थकीत विजेच्या बिलाची वसुली करण्याकरिता गेलेल्या वीज कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. याचा निषेध करीत कर्मचाºयांना सुरक्षा प्रदान करावी या मागणीकरिता वीज कर्मचाºयांनी आज वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.शनिवारला भंडारा शहरातील तकीया वॉर्डात एका वीज ग्राहकाने वीज कर्मचाºयांना मारहाण केली. आनंद मोहतुरे, धर्मेश चव्हाण, रंजित पानतावणे, छाया नंदागवळी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप संयुक्त कृती समितीने केला आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ कृती समितीने आज वीज कार्यालयासमोर धरणे दिले.या धरणे आंदोलनानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. यानंतर अधीक्षक अभियंता ए.के. गेडाम यांना कृती समितीने निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत थकबाकी वसुली व वीज चोरी मोहिमेंतर्गत पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तसेच वीज कर्मचाºयांना काम करण्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने मिळत नसल्याने ते देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एका आठवड्यात वीज कर्मचाºयांना सुरक्षा साधने पुरविण्याचे आश्वासन यावेळी अधीक्षक अभियंता गेडाम व कार्यकारी अभियंता हिवरकर यांनी दिले. या धरणे आंदोलनात कृती समितीतर्फे हरिश डायरे, प्रशांत भोंगाडे, ए.बी. कुरैशी, सुशिल शिंदे, डी.एस. पंचबुद्धे, एस.एफ. धम्ममेला, शामकिशोर वंजारी, विजय सोनटक्के, सुनिल बांगरे, एच.डी. केवट, धम्मदीप फुलझेले, महेश मेश्राम, अजय उमप, पंकज आखाडे, बी.ए. गभणे, जीवन शेंडे, माधुरी वाटकर, सुप्रिया बागडे, जया कोरे, वंदना डोकरे, मनिषा राठोड, सुजाता सोनटक्के, विजया जीवने, मेघा केसलकर, शर्मिला इंगळे, शुभांगी इलमे, जीवनलता वडस्कर आदी उपस्थित होते.
वीज कर्मचाºयांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:59 PM
थकीत विजेच्या बिलाची वसुली करण्याकरिता गेलेल्या वीज कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली.
ठळक मुद्देप्रकरण कर्मचाºयांना मारहाणीचे : सुरक्षा देण्याची मागणी