लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवारांना तलावाचे स्वरूप आले आहे. गावातील रस्ते चिखलमय झाली असून वाहतुकीची तारांबळ उडत आहे.कोरडवाहू करडी परिसरात पावसाने मागील दहा वर्षांचा रेकार्ड मोडला आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला कधी नव्हे ऐवढा धो...धो पाऊस पडला. संततधार पावसामुळे कौलारू घरे ओलेचिंब होवून नुकसानग्रस्त झाले.शेतशिवार जलमय झाल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. करडी परिसरात अंदाजे ६० ते ६५ मिलिमिटर पर्यंत पाऊस झाल्याने कोरडे नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तलावात पाण्याचा साठा वाढला तर लहान बोड्या ओव्हरफ्लो झाल्याने मासोळ्यांची चढण वाढली आहे.उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी भरल्या असून गावातील कच्च्या रस्त्यांवर चिखलच चिखलदिसून येत आहे. परिसरातील मोहगाव नाला, बोरगाव, खडकी, पांजरा, पालोरा, देव्हाडी नाला ओसंडून वाहत आहे. पेरण्या बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत. आणखी पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे.रोगराईची भीतीपाच दिवस अतिवृष्टी झाल्याने गावातील नाल्या पाण्याचे भरल्या तर नाल्यांतील घाण पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषीत झाल्याने पाण्याचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कच्या घरांचे नुकसान झाले असून अनेकांच्या भिंती पडल्या आहेत. नागरिकांची गरम केलेल्या पाण्याचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
दमदार पावसामुळे नाल्यांना पूर, पऱ्हे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:56 PM
गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवारांना तलावाचे स्वरूप आले आहे. गावातील रस्ते चिखलमय झाली असून वाहतुकीची तारांबळ उडत आहे.
ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट : करडी परिसरातील शेतशिवारात पाणीच पाणी, रस्ते चिखलमय