लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चार गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रस्ता बांधकामात फुटली. त्यामुळे सध्या पाणीपुरवठा बंद आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास जलवाहिनीचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. खापा गावाजवळ ही जलवाहिनी फुटली. प्राधीकरण अधिकाºयांनी मागील आठ दिवसात दोनदा पाहणी केली.खापा शिवारातील रस्ता बांधकामात खापा, मांगली, परसवाडा दे., स्टेशनटोली या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरण पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. रस्ता बांधकामा दरम्यान पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे बंद पडले आहे. यासंदर्भात परसवाडा दे., येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी भंडारा येथील महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अधिकाऱ्यांना तक्रार केली. त्यानंतर जीवन प्राधीकरणाचे वरिष्ठ अधिकारी खापा तुमसर येथे चौकशी व पाहणीकरिता आले. खापा शिवारात त्यांना जलवाहिनी फुटलेली आढळली. संबंधित कंत्राटदाराला जलवाहिनी दुरूस्तीचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. आठवडाभरात प्राधीकरणाचे अधिकारी दोनदा येवून गेले. परंतू अजुनपर्यंत जलवाहिनीचे कामे झाली नाही. त्यामुळे अजून किती दिवस प्रतिक्षा करावी असा प्रश्न येथे पडला आहे. फुटलेल्या जलवाहिनीची कामे तात्काळ न केल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी दिला आहे. सदर प्रकरणाची तक्रार सिंगाडे यांनी विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांचेकडे केली आहे.
जलवाहिनी फुटल्याने चार गावांचा पुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:45 PM
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : चार गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रस्ता बांधकामात फुटली. त्यामुळे सध्या पाणीपुरवठा बंद आहे. महाराष्ट्र ...
ठळक मुद्देरस्ता बांधकामाचा फटका : अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला दुरुस्तीचे आदेश