लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. सदर पाणी जलवाहिनी लिकेज मधून वाहत असल्याचे समजते. ही पाण्याची नासाडी नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणी जीवन आहे असे म्हटल्या जाते. पाणी वाचवा, पाणी जिरवा अशा म्हणींना आज मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. भर उन्हाळ्यात कोल्हापूरी बांधारा ओव्हरफ्लो वाहत असल्याने येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीजवळ हा जूना कोल्हापूरी बंधारा आहे. बंधाºयाच्या सभोवताल पाण्याचा मोठा हौद तयार झाला आहे. सदर बंधाºयाच्या अलीकडे माडगी रस्त्यावर ही नाल्यात पाण्याचा हौद तयार झाला आहे.बंधारा ओव्हरफ्लो स्थळ व परिसरातून जलवाहिन्या गेल्या आहेत. सदर जलवाहिन्या लिकेज असल्यानेच नाल्यात व बंधाºयात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे नागरिकांना पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागत आहे. हजारो लोकांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी सेवाभावी लोकांनी पाण्याचे टँकर लावून नागरिकांची तहाण भागवत आहेत.किमान जलवाहिन्या लिकेज दुरुस्त करण्याचे नियोजन करुन पाण्याची नासाडी थांबविण्याची तसदी कुणी घेतांनी दिसत नाही. पाणी मिळणे येथे दुरापस्त असून दुसरीकडे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. हे दृष्य पाहून यंत्रणेची किव येत आहे. सदर रस्त्यावरुन अनेक मोठे अधिकारी जातात. त्यांचे लक्ष या गंभीर बाबीकडे जात नाही काय? हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.कोल्हापूरी बंधाºयाजवळ कोट्यवधीचा पूल बांधकाम सुरु आहे. या पाण्याचा उपयोग पूल बांधकामाकरीता करणे सुरु आहे.भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. येथे जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. संबंधित यंत्रणा येथे गाफील आहे. पाणी वाचवा, पाण्ीा जिरवा यालाच म्हणावे काय? तात्काळ येथे उपाययोजना करावी.- सुधाकर कारेमोरे,शिवसेना, उपजिल्हा प्रमुख तुमसर
जलवाहिनी गळतीमुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणीच पाणी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:09 AM
तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे.
ठळक मुद्देपाण्याची नासाडी। तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील बंधारा