संजय साठवणे/देवानंद बडवाईक।आॅनलाईन लोकमतसाकोली/कुंभली : साकोली तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेत भाविक दुर्गाबाईदेवीचे व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी भक्तीभावाने येतात. विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर येथून भाविक येतात. श्रद्धेने डोहात आंघोळ करतात. पहाटेपासूनच पवित्र स्नानाला सुरूवात होते.या यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सेवा, भाविकांना राहण्याची सुविधा भाविकांसाठी पुरविल्या जातात. मकरसंक्रांतीच्या पर्वावर भरणारी ही यात्रा चार ते पाच दिवस असते. या यात्रेत पारंपरिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्यांची दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. पूर्वीपासून घोड्यांच्या विक्रीसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. दोन ते चार घोड्यांचे दर्शन मात्र होते.या यात्रेत विविध प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रूपयांची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, स्वेटर, जॅकेट, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, दगडी जाते, पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच मुलांना आकर्षण असलेले ब्रेकडॉन्स झुला, मौत का कुवा यामुळे यात्रेला भव्य स्वरूप येते. या यात्रेसाठी एस.टी. महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था केलेली असते. या डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करून पाणी अडविल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिगेटस तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे. या यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराना पहावयास मिळत असतो. यात्रेचे स्वरूप बघता पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहे. भाविकांना शिस्तीने दर्शन घेता यावे याकरिता पुरूष व महिलांकरिता व्यवस्था केली आहे.यात्रेत किरकोळ दुकानात खरेदी विक्रीमुळे प्लॉस्टिकचा वापर होतो. त्यामुळे प्लॉस्टिकचा वापर होऊ नये व यात्रा प्लॉस्टिकमुक्त व पर्यावरण पुरक व्हावा याकरिता स्वयंसेवकांद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त गावात भजन, पूजन, नाटक, कव्वाली असे मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असतात.अंधारलेले उत्तरवाहिनी तीर्थक्षेत्र प्रकाशलेआॅनलाईन लोकमतलाखांदूर : मागील अनेक वर्षांपासून उत्तरवाहिनी दांडेगाव तीर्थक्षेत्र परिसरात विजेची मागणी प्रलंबित होती. अखेर आ.राजेश काशिवार यांनी ही समस्या मार्गी लावल्यामुळे अंधारलेले तीर्थक्षेत्र उत्तरवाहिनी प्रकाशमय झाली आहे.लाखांदूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र उत्तरवाहिनी येथे १४ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त यात्रा भरते. लगतच्या जिल्ह्यातून हजारो भाविक येथे येतात. तीन दिवस भाविकांच्या गर्दीने नदी परिसर फुलून दिसतो. भगवान शंकराचे देवस्थान व पुरातन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी वर्षभर गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने निवासी संस्कार शिबिर, भजन, कीर्तन व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. हे सर्व होत असताना मात्र या निसर्गरम्य तीर्थस्थळी विद्युत पुरवठा नसल्याने अंधारात होते.मांढळ, दांडेगाव येथील गुरुदेव सेवा मंडळातील सदस्यांनी अनेकदा मागणी केली. विद्युत विभागाचे उंबरठे झिजविले याचा काहीएक फायदा झाला नाही. दरम्यान, आ.राजेश काशिवार हे तीर्थक्षेत्र उत्तरवाहिनी मंदिरात गेले असता तिथे वीज पुरवठा नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मांढळ, दांडेगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून येत्या मकर संक्रातीला विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा विषय ठेऊन १० लाख रूपयांचा निधी तात्काळ मंजूर करून घेतला. आता यात्रा सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठा सुरू करून दिला.
दुर्गाबाईडोह कुंभली यात्रेला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:08 PM
साकोली तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे.
ठळक मुद्देपाच दिवस राहणार यात्रा : भाविकांच्या दर्शनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी