शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गतिमान प्रशासन हेच कामाचे सूत्र

By admin | Published: June 03, 2015 12:46 AM

जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील राहून प्रशासन गतिमान करण्यावर आपला भर राहील.

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची ग्वाहीभंडारा : जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील राहून प्रशासन गतिमान करण्यावर आपला भर राहील. सिंचनाअभावी हरीतक्रांती रखडलेल्या गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे पुनवर्सन, तलावांचे पुनरूज्जीवन ही कामे प्राधान्यक्रमाने करण्यात येतील. ‘टीम वर्क’ वर आपला विश्वास असून पारदर्शक प्रशासन हेच आपल्या कामाचे सूत्र असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यात वने, तलाव, खनिज अशी खूप क्षमता असून त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात खरीपाच्या लागवड क्षेत्रापैकी रबीचे लागवड क्षेत्र कमी आहे. ते वाढविण्यासाठी योजना आखावी लागणार आहे. जिल्ह्यात टसर, मत्स्यपालन, ऊस पीक, हळदीचे पीक होत असून टसरचे क्लस्टर डिझाईन करण्यासाठी वाव आहे. ‘भंडारा सिल्क साडी’ या ब्रॉण्डने जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे, यासाठी काम करायचे आहे. नोव्हेबर महिन्यात खासदार नाना पटोले यांच्या कल्पनेतून साकार होणारा वैनगंगा महोत्सव साजरा करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे.जलयुक्त शिवार हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातंर्गत ४७० कामे घेण्यात आली असून ३५० कामे झालेली आहे. १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. भंडारा तलावांचा जिल्हा असल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत तलावांची देखभाल व दुरुस्ती करुन त्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.३ जूनपासून पर्यावरण सप्ताह गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून असा पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात वृक्ष लागवड व संवर्धन करायचे असून ८ ते १० लाख वृक्ष लागवड करण्यात येईल. यासाठी जनतेने कर्तव्य म्हणून सहकार्य केले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)- तर बॅकांविरुद्ध एफआयआरशेतकऱ्यांना ज्या बॅका कर्ज देणार नाही किंवा सक्तीने कर्ज वसुली केली तर अशा बॅकांविरुद्ध १३३, १८८ या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. गरज पडली तर एफआयआर सुद्धा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी स्पष्ट केले.ई-आॅफिस करणारयापूढे जिल्हा प्रशासनात पारदर्शक कामे होणार असून ही कामे जनतेला कळावी यासाठी आपली भविष्यात ‘ई-आॅफिस’ करण्याची संकल्पना आहे. जेवढी माहिती प्रशासनाकडे आहे ती माहिती जनतेला कळण्यासाठी संकेतस्थळावर टाकण्यात येईल. रेती तस्करी रोखणाररविवारच्या दिवशी रेती घाटातून उपसा करण्यात येऊ नये, असा नियम आहे. यापूढे कोणत्या घाटातून रेतीचा किती उपसा झाला याची नियमित नोटींग करण्यात येणार असून रेतीच्या तस्करीवर आळा घालण्यात येणार असल्याचे सांगितले.