लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर तिला भाषाशास्त्राचे नियम लावून आपण तिला अधिक क्लिष्ट करीत असतो. झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ आहे. बोली ही मुळात पवित्र असून तिची सेवा करणाऱ्या झाडीबोली चळवळीने एक दबावगट निर्माण केला आहे, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उद्घाटनपर भाषणात केले.तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्र व झाडीबोली साहित्य मंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. घनश्याम डोंगरे, साहित्य नगरी पेट्रोलपंप जवाहरनगर येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी बंडोपंत बोढेकर हे होते. यावेळी डॉ. हरिश्चंद्र बोरकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेश टेंभरे, राम महाजन, हिरामन लांजे, डॉ. तिर्थराज कापगते, डॉ. अनिल नितनवरे, उदय किरोला, मोतीभाई नायक, शिवशंकर बावनकुळे, डॉ. राजन जयस्वाल, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, शिवशंकर घुगूल, मिलिंद रंगारी, प्राचार्य अजयकुमार मोहबंशी सर्व माजी समेलनाध्यक्ष उपस्थित होते.यावेळी श्रीपाद जोशी यांनी, भाषेच्या बाबतीत विदर्भातील माणसं लहान वाटतात आणि पलिकडील माणसं मोठी वाटतात हे आपलं सत्व झुगारून दिल पाहिजे. जे भाषेच्या संबंधात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे पहिले अध्यक्ष अनिल यांनी झुगारले आणि अनुस्वार तिकडेच फेकले. ११ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत विदर्भ हा भाषा कला सांस्कृत नाटक, आश्वाद, खगोल ज्योतीशास्त्र, गणित, कृषीमध्ये नायक होता, हे विषरता कामा नये. वेदकाळापासून या महाराष्ट्राच्या कुठल्या भूमिचा जर विचार केला असेल तर तो विदर्भभूमीचा उल्लेख होते आणि ते अत्यंत बहुधार्मिक, बहुसांस्कृतीक, बहुभाषीक अशा संस्कृतीचा होतो.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा भाग व्याप यात तीन संस्था सम्मेलीत होत काळाची गरज आहे. यात कोकण महाराष्ट्र साहित्य परिषद दुसरे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व आपले झाडीबोली साहित्य मंडळ यामुळे साहित्याला नव उजाळा मिळेल नवचैतन्य लाभेल, असे प्रतिपादन केले. तत्पुर्वी सकाळी पुस्तक दिंडी काढण्यात आली. ताळमृदुंगाच्या गजरात दिंडीला सुरूवात करण्यात आली. दंडार, खडी गंमत, भारूळ सादर करण्यात आले. तदनंतर पाहुण्याचे मार्गदर्शन झाले. साहित्य संमेलनाचे संचालन प्रा. नरेश आंबीलकर यांनी केले. यावेळी उपस्थितांची संख्या मोठी होती.
झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:31 AM
भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर तिला भाषाशास्त्राचे नियम लावून आपण तिला अधिक क्लिष्ट करीत असतो. झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ आहे.
ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन