लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत मंगळवारी येथे आयाेजित ई-रिक्षा रॅलीचे सारथ्य खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. रॅलीच्या अग्रभागी ई-रिक्षा चालवित असलेले जिल्हाधिकारी पाहून अनेकजण अचंबित झाले हाेते.येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला बचत गटांचा सक्रीय सहभाग हाेता. ११० स्पर्धकांनी या रॅलीत भाग घेतला. खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रिक्षा चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.समाराेपीय कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनाेद जाधव, प्रशासन अधिकारी चंदन पाटील, माविमचे समन्वयक प्रदीप काठाेळे आदी सहभागी झाले हाेते.ई-रिक्षा रॅली शहरातील विविध मार्गावरुन गेली त्यावेळी सर्वांच्या नजरा जिल्हाधिकारी चालवित असलेल्या ई-रिक्षावर हाेत्या.
पर्यावरण संवर्धनाची लाेकचळवळ व्हावी- माझी वसुंधरा ही पर्यावरण संवर्धनाची लाेक चळवळ व्हावी यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात आपला वैयक्तिक व सामुहिक सहभाग नाेंदवून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. पेट्राेल, डिझेल या पारंपारिक इंधनाचे मर्यादीत साठे लक्षात घेता ई-वाहनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.