लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून आजच्या युवा पिढीने रक्तदान करून कुणाचे प्राण वाचविण्याचे पुण्य करायला हवे त्यामुळे तुम्हाला कधी न लाभलेले समाधान मिळेल, असे वक्तव्य जिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य अजय गायधने यांनी येथे आयोजित रक्तदान व रोगनिदान शिबिराप्रसंगी व्यक्त केले.बालमित्र शारदा उत्सव मंडळ संत कबीर चौक मोहाडी येथे रक्तदान व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील नगराध्यक्ष स्वाती निमजे या होत्या तर उद्घाटक म्हणून उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अजय गायधने, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, नगरसेवक जितेंद्र सोनकुसरे, रविकांत देशमुख, सायत्रा पारधी, यशवंत थोटे, डॉ. मिरा सोनवाने उपस्थित होते. याप्रसंगी ३२ युवकांनी रक्तदान केले तर रोगनिदान शिबिराचा ५०० रुग्णांनी लाभ घेतला. रक्तदान करणाºयामध्ये विजया भानारकर, ज्योतीस नंदनवार, मनिष पराते, अनुप निखारे, कोमल धकाते, सुनिल निखारे, जितेंद्र सोनकुसरे, पुरूषोत्तम पराते, प्रविण पराते, घनश्याम डेकाटे, अरविंद निखारे, सुखदेव पातरे, संजय निनावे, नरेंद्र हेडाऊ, मुन्ना निखारे, नितेश रंभाड, प्रविण नंदनवार, प्रविण गायधने, गणेश कोहाड, प्रविण हेडाऊ, निलेश माहुरकर, प्रकाश मारबते, धनराज गोन्नाडे, अतुल निखारे, सागर चंद्रीकापुरे, पांडूरंग निखारे, शैलेंद्र बांडेबुचे, सचिन खराबे, नरेश निमजे, नंदकिशोर पडोळे, सेवक नगरधने, प्रितेश निखारे यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला रक्तपेढी येथील सुरेखा भिवगडे, रोहिनी हलमारे, डॉ. हंसराज हेडाऊ, विनोद बाभरे, हेमलता दलाल, दामु निखारे, बबलु सैय्यद, पुरूषोत्तम पातरे, विश्वनाथ बांडेबुचे, चुडामन पराते, कल्याणी दलाल, मंगला पातरे, यमुना निखारे, गिरजा निमजे, अशोक पराते, अनिता पराते उपस्थित होते.कार्यक्रमासाठी मनिषा पराते, सुखदेव पातरे, कोमल धकाते, संजय निनावे, सुनिल निखारे, मुन्ना निखारे, नितीन निमजे, प्रविण पराते, राहुल हेडाऊ, मनिष पातरे, कोमल पराते, घनश्याम डेकाटे, अरविंद निखारे, मिलिंद हेडाऊ, ज्ञानेश्वर निमजे, आकश निपाने यांनी सहकार्य केले.
रक्तदान करून पुण्य कमवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:17 AM
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून आजच्या युवा पिढीने रक्तदान करून कुणाचे प्राण वाचविण्याचे पुण्य करायला हवे त्यामुळे तुम्हाला कधी न लाभलेले समाधान मिळेल,...
ठळक मुद्देअजय गायधने : मोहाडीत रक्तदान, रोगनिदान शिबिर