मिठाईवर वर्ख : अन्न व औषध विभागाची तपासणी सुरूभंडारा : सणासुदीच्या दिवसात मिठाईला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी मिठाईवर चांदीच्या वर्खऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख लावला जातो. तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सणासुदीत मिठाई खा, जरा जपून, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. -तर होणार कारवाई सणासुद्धीच्या काळात रवा, खाद्यतेल, बेसन, खवा आदी पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार अलिकडच्या काही वर्षात वाढू लागले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिठाईत ठराविक प्रमाणापेक्षा अधिक खाद्यरंग वापरणे, चांदीच्या वर्खाऐवजी अल्युमिनियम वर्ख वापरणे, दुधात साखर तसेच युरिया किंवा डिटर्जंटचे अयोग्य प्रमाण आढळणे, मिरची व हळद पावडरमध्ये अखाद्य रंग आढळणे याची तपासणी सुरू आहे.मिठाई खरेदी करताना नागरिकांनी दुकानदारांकडून बिलाची मागणी करावी. विषबाधेचे प्रकार घडल्यास संबंधित दुकानदाराला दोषी धरता येऊ शकते, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) बी.जी.नंदनवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मिठाई खा, जरा जपून !
By admin | Published: September 23, 2015 12:44 AM