लोकमत न्यूज नेटवर्कआसगांव : चौरास भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. यावर्षी अनेक शेतकरी कोसा उत्पादनातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी सरसावले आहे. आसगावात १५ शेतकºयांनी कोषाचे उत्पादनाला सुरवात केली असून शेतकरी समाधानी आहेत. अन्य शेतकºयांनीही याकडे वळून आपली उन्नती साधावी, असे आवाहन केले. यासाठी प्रत्येकांना सेंट्रल बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय करण्याचे आश्वासन बँकेच्या मुख्यधिकाºयांनी केले आहे.कोसाचे उत्पादनासाठी प्रथमत: तुतीच्या झाडांची लागवड करावी लागते. जुलै ते आॅगस्ट महिन्यात तुतीच्या झाडांची लागवड शेतकºयांनी केली. झाडे उंच झाले. त्यानंतर १ आॅक्टोबरला शेतकºयांनी कोषा उत्पादनासाठी शेडमध्ये व्यवस्थीत बेड तयार केले. त्यासाठी बंगलोर येथून अंडीपुंज आणले. चार सहा दिवसांनी अंडीमधून कोस अळी बाहेर पडली. त्यानंतर त्यात तुतीची पाने अळींना खाद्या म्हणून टाकण्यात आले.१५ दिवसांनी कोस अळीने कोस तयार करण्यात सुरवात केली. येथील भुपेश ब्राम्हणकर, संजय ब्राम्हणकर, किशोर काटेखाये, जीवन फुंडे, अमित डोये, संध्या डोये, मधुसुधन डोये, राजेश सावरबांधे, संदीप देशमुख, सावरबांधे, गीरीधर कोरे, रमेश हुकरे, मोरेश्वर डोये, प्रतिक्षा मेंढे, राजपुत गजभिये तसेच अनिल मेंढे या १५ शेतकºयांनी १९ एकर जागेत तुतीची लागवड करून कोसा उत्पादनास सुरूवत केली.त्यानुसार एक एकर जागेत सरासरी ३ क्विंटल कोसाचे उत्पादन काढण्यात आले. ४०० रूपये किलोप्रमाणे कोस उत्पादन विकले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वर्षातून कमी अधिक चार पीके घेऊ शकत असून एकरी दोन लाखाचे अपेक्षित उत्पादन होत असल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे. यामुळे बहुतेकांना रोजगार उपलब्ध होत असून अन्य शेतकºयांना कोषाची शेती करायची झाल्यास सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक कर्ज स्वरूपात आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देत आहेत.चौरास भाग हा धान शेतीसाठी प्रसिद्ध असला तरी अन्य लागवडीसाठी किंवा शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करून शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव अग्रेसर आहे.
कोसा उत्पादनातून शेतकºयांची आर्थिक उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:13 PM
चौरास भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. यावर्षी अनेक शेतकरी कोसा उत्पादनातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी सरसावले आहे.
ठळक मुद्देचौरास भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत.