आधुनिक काळात लहान बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल, त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण कशाप्रकारे मिळवून देता येईल, या विषयाची सांगोपांग चर्चा करण्यात आली. परिषद केंद्रप्रमुख वसंत साठवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे यांनी सद्यस्थितीत सुरू असलेले ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण याबाबत आढावा घेतला. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. विषय शिक्षक बीआरसी बेदरकर यांनी अध्ययनस्तर निश्चिती याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. विषय शिक्षक बीआरसी विनिता भेंडारकर यांनी दर शनिवार व रविवारला येत असलेल्या स्वाध्याय उपक्रम, लिंक कशी भरायची यावर प्रकाश घातला. जिल्हा तंबाखूमुक्त अभियान समन्वयक डॉ. कुकडे यांनी तंबाखूवरील दुष्परिणाम व तंबाखूतील हानीकारक पदार्थ याबाबत माहिती सांगितली. पदवीधर शिक्षक रामप्रसाद मस्के यांनी तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष याबाबत माहिती सांगितली. पदवीधर शिक्षक वसंत काटेखाये यांनी स्वच्छता कृती आराखडा व कोबो लिंक यावर मार्गदर्शन केले. अमिता रहांगडाले यांनी स्वाध्याय सोडविण्याबाबत मार्गदर्शन केले. ‘थँक्स ए टीचर’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत केंद्रप्रमुख वसंत साठवणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन व आभार साखरकर यांनी केले.
कोंढी येथे शिक्षण परिषद सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:39 AM