वसुलीसाठी पत्रांवर पत्र : १३ भाडेकरुंकडे ३८ लाखांची थकबाकी, वित्त, कृषी, बांधकाम, आरोग्य, सामान्य प्रशासन थकबाकीदार प्रशांत देसाई ल्ल भंडारा मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद इमारतीत विविध विभागांचे कार्यालय भाडेतत्वावर आहेत. मात्र या भाडेकरुंनी मागील अनेक वर्षांपासून भाडे थकीत ठेवले आहे. यात शिक्षण विभागाचा अग्रक्रम असून मागील १९ वर्षांपासून त्यांनी भाडे थकविले आहे. ही रक्कम एक, दोन लाखात नसून तब्बल १९ लाखांच्या घरात पोहचली आहे. येथील १३ विभांगाकडे ३८ लाखांचे भाडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदची दोन माळ्याची इमारत आहे. या इमारतीत समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, कृषी, वित्त, सामान्य प्रशासक, सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, मध्यवर्ती बँक, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रेशीम कार्यालय भाडे तत्वावर आहेत. या विभागाला देण्यात आलेल्या जागेचे स्क्वे. सेंटीमिटर नुसार भाडे वसुल करण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून हे विभाग या इमारतीत आहेत. नागरिकांना कामानिमित्त आल्यानंतर सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनाने जिल्हा परिषदमध्ये या विभागांना जागा दिली आहे. मात्र त्यांना याबद्ल्यात भाडे मोजावे लागते. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या सर्व विभागांची भाडेवसुली व इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपविली आहे. या भाडेकरुंकडून वसूल करण्यात आलेली रक्कम जिल्हा निधीत जमा करण्यात येते. ही रक्कम जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येते. मात्र इमारतीतील या भाडेकरुंकडे भाडे थकीत असल्याने जिल्हा विकासालाही फटका बसला आहे. ३१ मार्चपुर्वी सर्व १३ ही भाडेकरुंनी भाडे जमा करावे या संबंधात बांधकाम विभागाने त्यांना या महिन्यात दोनवेळा पत्रव्यवहार केला आहे. सर्वाधिक भाडे शिक्षण विभागाचे असून ते १८ लाख ६६ हजार ९६० रुपये एवढे आहे. मागील १९ वर्षांपासून हे भाडे थकीत ठेवण्यात आले आहे. यानंतर भाडे थकीत ठेवण्यात समाजकल्याण विभागाचा क्रमांक असून त्यांच्याकडे ६ लाख ६८ हजार १६० रुपये तर कृषी विभागाकडे ५ लाख ८४ हजार ३६० रुपये थकीत आहे. थकीत भाडे आकारणी व शिल्लक भाडे अ.क्र. विभागाचे नाव मासिक भाडे शिल्लक भाडे १) समाजकल्याण १,८६०/- ६,६८,१६०/- २) शिक्षण ८,१८०/- १८,६६,९६०/- ३) आरोग्य ५,८३०/- ६९,९६०/- ४) कृषी ४,७९०/- ५,८४,३६०/- ५) वित्त ६,३७५/- ७६,५००/- ६) सामान्य प्रशासन ११,५८०/- १,३८,९६०/- ७) सार्वजनिक बांधकाम ४,२८०/- १,०२,७२०/- ८) लघु पाटबंधारे ४,२८०/- ५१,३६०/- ९) पशुसंवर्धन २,१००/- १,२७,४७०/- १०) ग्रामीण पाणीपुरवठा ३,३००/- ३९,६००/- ११) मध्यवर्ती बँक ५,१९०/- ३१,१४०/- १२) प्रधानमंत्री ग्राम सडक ८,६४०/- २५,९२०/- १३ जिल्हा रेशीम कार्यालय ३,०००/- ४०,०००/- एकुण ६९,४०५ ३८,२३,११०/- वसुलीदार थकबाकीदारांच्या यादीत ४विशेष महत्वाची बाब म्हणजे भाडे वसुली व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्व थकीत भाडेकरुंसारखेच भाड्याची रक्कम थकीत आहे. ही रक्कम १ लाख २ हजार ७२० रुपये एवढी असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या विभागाने सर्वांना ज्याप्रमाणे थकीत भाडे भरण्यासाठी पत्रव्यवहार केला. तसाच पत्रव्यवहार स्वत:चाच कार्यालयाशी करुन भाडे जमा करण्यासंबंधी सुचनाही दिल्या आहेत. १३ पैकी तिघांचे भाडे जमा ४या इमारतीत १३ विविध विभाग भाडे तत्वावर आहेत. यापैकी केवळ तीन विभागाने या चालू वित्तीय वर्षात त्यांच्याकडील थकीत भाड्यापैकी काही रक्कम जमा केली आहे. यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३९ हजार ६०० रुपये, मध्यवर्ती बँक ३१ हजार १४० व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाने ७७ हजार ७६० रुपये जमा केले आहे. आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या वित्त विभागाकडे थकबाकी असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्व विभागांकडून दरवर्षी भाडे प्राप्त होण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येतो. शासनाकडून आर्थिक निधीची पुर्तता होत नसल्याने अनेकांसमोर व्यवहार करताना अडचणी येतात. तरीही भाडेकरु विभागानी मार्चअखेरपर्यंत त्यांच्याकडील थकीत भाडे भरण्यासंदर्भात पत्रव्यवहार करुन सुचना देण्यात आल्या आहेत. -आर. एन. शेळके, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जि.प. भंडारा.
शिक्षण विभागाने थकविले १९ लाखांचे भाडे
By admin | Published: January 31, 2017 1:08 AM