सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा फी शाळेत भरत आहेत. सर्व विषयाचे अध्यापन कार्य सुरू असताना खेड्यात जेथे शाळेची सोय नाही ते विदयार्थी वसतिगृहात राहून शिकतात,. परंतु शाळा सुरू होऊन एक महिना कालावधी झाला असतानाही शासनाने वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने वसतिगृहातील विदयार्थी घरीच राहत आहेत. यामुळे त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पवनी तालुक्यात कोंढा, पवनी, अडयाळ, आसगावसह अनेक ठिकाणी अनुदानीत वसतिगृह आहेत, खेड्यापाड्यातील मुले वसतिगृहात शिकत असतात ,पण त्यांचे शिक्षण खंडित झाले आहे. .हे विदयार्थी दहावी ,बारावी परीक्षेची तयारी कसे करतील असा प्रश्न अनेक पालक करीत आहेत यासाठी समाजकल्याण विभागाने याकडे लक्ष देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत.
कोट
"वसतिगृह सुरू करण्याचा समाजकल्याण विभागाने आदेश काढला नाही ,त्यामुळे अडचण आहे. शासनाचा आदेश निघताच वसतिगृह सुरू करण्यात येईल" . डॉ नितीन हुमने , संस्थापक
ReplyForward