लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलातील गैरव्यवस्थेबाबद विचारणा करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयावर आज धडक दिली. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात ही धडक देण्यात आली.जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला कुलूप बंद करण्याच्या इराद्याने कार्यकर्ते तिथे पोहचले होते. मात्रा जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी आठ दिवसात जलतरण तलाव सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले. सोबतच क्रीडा संकूलातील इतरही दुरवस्था तात्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. खेळाडूंना सराव करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही, मैदानाची निगा राखली जात नाही, जलतरण तलाव बदं आहे, कोट्यवधी रूपयांचा निधी मिळत असतांना क्रीडा संकूलाकडे दूर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. कोट्यवधी रूपयाचा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणातील सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी आंदोलनकर्त्याना दिले.जिल्हा क्रीडा संकूलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असले तरी या कार्यालयात शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याबाबद उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच स्वखर्चाने शिवाजी महाराजांचा फोटो तात्काळ लावण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, जिल्हा संघटक आशिष चुटे, विकास मदनकर, क्रिष्णा ठोसरे, शैलेश श्रीवास्तव, जतीन शहा, महेश दलाल, उमेश निपाने, गजू कारेमोरे, विवेक कारेमोरे, विकास बागडे, विश्वनाथ ठाकरे, मयुर राखडे, आयुष नागरीकर, चेतन मैदलकर, मोहीत वडतकर, विपीन वडतकर आदि उपस्थित होते.
जलतरण तलावासाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:05 PM
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलातील गैरव्यवस्थेबाबद विचारणा करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयावर आज धडक दिली. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात ही धडक देण्यात आली.
ठळक मुद्देक्रीडा संकुल बचाव समितीचा पुढाकार : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आश्वासन