तुमसर : तामसवाडी-पांजरा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रॅक्टरवर तुमसर तहसीलदारांनी कारवाई केली. पुन्हा रेती चोरी केल्यास ट्रॅक्टरचा परवाना रद्द करावा, असे हमीपत्र ट्रॅक्टर मालकाकडून लिहून घेण्यात आले. प्रती ट्रॅक्टरवर १० हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.तुमसर तालुक्यातील रेती घाटांचा लिलावांचा कार्यकाळ संपला असून नवीन प्रक्रिया सुरू आहे, परंतु नदीपात्रातील रेती राजरोसपणे अवैध उपसा करणे सुरूच आहे. यात आष्टी, लोभी, तामसवाडी, माडगी, चारगाव, सुकळी, वारपिंडकेपार, बपेरा, नाकाडोंगरी रेतीघाटावरून रेती उपसा सुरू आहे. प्रती ट्रॉली ३००० हजार एवढा भाव आहे. ट्रॅक्टरचालकांना सुगीचे दिवस आले आहे. तहसीलदार डी.टी. सोनवाने यांना रेती चोरीची माहिती मिळताच तहसीलदार सोनवाने यांनी नायब तहसीलदार गौड यांना कारवाईकरिता पाठविले. काही ट्रॅक्टर तामसवाडी रेती घाटावरून वाहतूक करताना सापडले. टीवीबद्दल विचारणा केल्यावर रेती चोरीची असल्याचे कबूल केले. नऊ ट्रॅक्टर एक रिकामा तहसील कार्यालयात जमा केले. यातील आठ ट्रॅक्टरवर प्रति ट्रॅक्टर १०,४००प्रमाणे दंड आकारण्यात आला. यापुढे रेती चोरी करणार नाही तथा ट्रॅक्टरचा परवाना रद्द करावा, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आदेश देऊन रेती चोरी करणाऱ्यावर १० हजार ४०० रूपयांचा दंड व हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. या रेती घाटांवर सर्रास रात्री व पहाटे अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनालाही एकावेळी सर्वच रेती घाटांवर जावून कारवाई करणे निश्चितच शक्य नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करतानी जिवाला धोका आहे. गौण उपशाकरिता पथक नियुक्तकरण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)रेती चोरी करणाऱ्या नऊ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रती ट्रॅक्टर १०,४०० रूपये दंड वसूल करण्यात आला. यापुढेही चोरटी रेती वाहतूक करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-डी. डी. सोनवाने,तहसीलदार तुमसर.उपसा सुरूच४वैनगंगा नदीपात्रातील रेतीची अवैध वाहतूक केली जात असुन या अवैध रेतीसाठी महसुल अधिकारी व वाळुमाफीयाची साठगाठ असुन यातुन शासनाच्या लाखो रूपयांचा महसुल बुडाला आहे. अवैध रेती वाहतुकीवर बंदी केव्हा येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले
By admin | Published: December 29, 2015 2:46 AM