लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अकोला येथील एका कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यक्तीगत आयुष्याविषयी बोलले. राहुल गांधी आमचे नेते असून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलले कसे एैकून घ्यायचे असे सांगत त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. चार तासानंतर त्यांना सोडण्यात आले.ना.आठवले हे रविवारला आंबेडकरी विचार संमेलनासाठी भंडाºयात आले असता काँग्रेसचे जि.प.चे माजी उपाध्यक्ष दीपक गजभिये, माजी नगरसेवक धनराज साठवणे, टेकचंद मारबते, पृथ्वीराज तांडेकर, सचिन गिºहेपुंजे, प्रमोद लिमये, दिलीप देशमुख, अक्षय भिवगडे, लंकेश साठवणे, जीवन भजनकर यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. चार तास पोलीस मुख्यालयात ठेऊन त्यांना सोडण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर हे संमेलनात मंचावर होते.
काँग्रेसने दाखविले आठवलेंना काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 9:56 PM