लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यासाठी २१ डिसेंबर राेजी हाेणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारताेफा रविवार दि.१९ डिसेंबर राेजी रात्री १२ वाजता थंडावणार आहे. मात्र रात्री १० नंतर काेणतीही सभा घेता येणार नाही. जिल्हा परिषदेच्या ३९ गटात २४५ तर पंचायत समितीच्या ७९ गटात ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून संभ्रम असल्याने उमेदवारांना पुरेशा वेळ प्रचारासाठी मिळाला नाही.भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्यात २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला साेमवार १३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु निवडणूका हाेणार की नाही असा संभ्रम शुक्रवारपर्यंत कायम हाेता. अखेर निवडणूका हाेणे निश्चित झाल्यानंतर उमेदवार प्रचाराला लागले. मात्र अवघे तीनच दिवस खऱ्या अर्थाने त्यांच्या हाती आले आहे. २१ डिसेंबर राेजी मतदान हाेत असल्याने मतदान सुरू हाेण्याच्या २४ तासांपूर्वी १९ डिसेंबर राेजी रात्री १२ वाजता प्रचारताेफा बंद हाेणार आहे. मात्र रात्री दहा नंतर सभा, माेर्चे, ध्वनीवर्तकाचा वापर करता येणार नाही. रविवारी जिल्ह्यात अनेक नेत्याच्या सभा प्रचारासाठी आयाेजित आहेत. जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी २४५ उमेदवार रिंगणात असून त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला आणि पंचायत समितीच्या ७९ गणात ४१७ उमेदवार रिंगणात असून त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे. मतदाराच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना आपली भूमिका समजावून सांगत आहे.
प्रचारासाठी खऱ्या अर्थाने मिळाले तीन दिवस- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सुरुवातीपासून निवडणुकीत संभ्रम दिसत हाेता. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाल्याने हा संभ्रम वाढला. निवडणूक हाेणार की नाही अशी चिंता उमेदवांराना लागली हाेती. त्यातच ३९ जागांसाठी १३ मार्च राेजी चिन्हांचे वाटप हाेऊन प्रचाराला प्रारंभ झाला. परंतु निवडणूक ऐनवेळी रद्द झाली तर काय? अनेकांनी प्रचारासाठी पाहिजे तसा जाेर लावला नाही. अखेर शुक्रवार १७ डिसेंबर राेजी निवडणूक आयाेगाने सर्वसाधारण, एससी, एसटी प्रवर्गातील निवडणूका नियाेजित कार्यक्रमानुसार हाेतील असे घाेषित केले आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. यात उमेदवारांना प्रचारासाठी तीनच दिवस मिळाले.