सात सदस्य अविरोध : पाच जागांसाठी होणार मतदानभंडारा : सहकार क्षेत्रातील जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारला होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात संचालक अविरोध निवडून आले. दोन महिला संचालक पदासाठी तीन महिला रिंगणात आहेत. त्यापैकी एका महिला उमेदवाराने दोघांना समर्थन घोषित केल्यामुळे या दोन जणांचा अघोषित विजय झाला आहे. परंतु त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या दोन जागांसह एकणू पाच जागांसाठी मतदान होईल. यापूर्वी रामलाल चौधरी, विनायक बुरडे, सदाशिव वलथरे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, महेंद्र गडकरी, राम गाजीमवार हे सदस्य अविरोध निवडून आले. महिला प्रवर्गातून नीतू सेलोकर, रिता हलमारे, अनिता साठवणे हे तिघे रिंगणात आहेत. सेलोकर यांनी हलमारे व साठवणे यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे सेलोकर निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विलास काटेखाये हे पवनी तालुक्यातून रिंगणात आहेत. त्यांची हिरालाल खोब्रागडे यांच्याशी लढत होईल. लाखांदूर तालुक्यातून गोपीचंद भेंडारकर व संतोष शिवणकर तर ओबीसी प्रवर्गातून क्रिष्णा अतकरी व नरेश धुर्वे हे एकमेकांविरुद्ध रिंगणात आहेत. दुपारी मतदान आणि त्यानंतर काही वेळातच मतमोजणी होणार आहे. एकूण १२ सदस्यांपैकी सात सदस्य अविरोध निवडून आल्यामुळे पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. तीन जागांसाठी घोडेबाजार चांगलाच रंगला असून काहींनी चार दिवसांपूर्वीच आपल्या मतदारांना तीर्थयात्रेसाठी रवाना केले. ते रविवारला सकाळी भंडाऱ्यात पोहोचतील. यापूर्वी दुग्ध उत्पादक संघाच्या निवडणुका सामोपचाराने लढविल्या जात होत्या. मध्यंतरीच्या सहकार क्षेत्रातील चढाओढीमुळे या निवडणुकीत दोन गट आमनेसामने झाले. या वर्षाच्या शेवटी विधान परिषद निवडणूक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नगर पालिका निवडणूक होणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरूद्ध रिंगणात उतरले. नऊ उमेदवार सहजरित्या निवडून आणण्याची किमया एका गटाच्या नेत्याने घडवून आणली. दुग्ध संघाच्या निवडणुकीतून दुसऱ्या गटाला पद्धतशीरपणे बाजूला सारण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून रणनीती आखण्यात आली. यात सहकारातील काही नेत्यांना कमालीचे यश आले. यापुढच्या निवडणुकीत त्याचे (जिल्हा प्रतिनिधी)
दूध संघाची आज निवडणूक
By admin | Published: June 26, 2016 12:22 AM