आॅनलाईन लोकमतभंडारा : नगरपालिका येथील विशेष विषय समिती सभापतीपदाची निवडणूक आज बुधवारी पालिका सभागृहात पार पडली. यात सभापतीपदी शमीमा अख्तरी अजीज शेख, नितीन धकाते, कैलाश तांडेकर, चंद्रकला भोपे, गीता सिडाम, साधना त्रिवेदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपजिल्हाधिकारी तथा सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून डॉ.सुजाता गंधे यांच्यासह नवनियुक्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष रुबी चढ्ढा उपस्थित होते. सकाळी ११ वाजता सभेचे कामकाज सुरु करण्यापूर्वी विशेष समिती गठीत करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.त्यानंतर नगराध्यक्ष सुनिल मेंढे तथा राष्ट्रवादीचे गटनेते अॅड.विनयमोहन पशिने व काँग्रेस आघाडीचे गटनेते अब्दुल शमीम शेख यांनी समिती सदस्यांची समितीनिहाय यादी सादर केली. दुपारी २ वाजता सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. छाननीनंतर प्रत्येक समिती सभापती सर्व संमत्तीने अविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.यात स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी नितीन धकाते, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदावर शमीमा अख्तरी अजीज शेख, नियोजन आणि विकास समिती सभापती पदावर कैलाश तांडेकर, शिक्षण समिती सभापती पदावर चंद्रकला भोपे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर गीता सिडाम तर उपसभापतीपदी साधना त्रिवेदी यांची अविरोध निवड करण्यात आली. स्थायी समितीत रजनीश मिश्रा व मधुरा मदनकर यांची निवड करण्यात आली आहे.
भंडारा नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:27 PM
नगरपालिका येथील विशेष विषय समिती सभापतीपदाची निवडणूक आज बुधवारी पालिका सभागृहात पार पडली.
ठळक मुद्देसभापतीपदी धकाते, शेख, सिडाम, त्रिवेदी, भोपे, तांडेकर