भंडारा : ओबीसीसाठी राखीव असलेल्या भंडारा आणि गाेंदिया जिल्हा परिषदेतील एकूण २३ जागांवरील निवडणूक अखेर सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगित झाली आहे. यासाेबतच दाेन्ही जिल्ह्यातील पंचायत समितीच्या ४५ जागेवरील निवडणूक आता हाेणार आहे.
निवडणूक रद्द झालेल्यांमध्ये गाेंदिया जिल्ह्यातील गाेरेगाव तालुक्यातील निंबा, आमगाव तालुक्यातील किकरीपार, घाटटेमनी, सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी, इटखेडा, केशोरी, माहुरकुडा, महागाव, याशिवाय भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा, गर्रा, मोहाडी तालुक्यातील कांद्री, डोंगरगाव, वरठी, लाखनी तालुक्यातील लाखोरी, मुरमाडी सा., केसलवाडा वाघ, मुरमाडी तुप, भंडारा तालुक्यातील सिल्ली आणि पवनी तालुक्यातील ब्रम्ही व भुयार या २३ जागांचा समावेश आहे.
पंचायत समितीच्या ४५ जागा थांबल्या
जिल्हा परिषदेसाेबतच पंचायत समितीच्या जागांनाही या निर्णयामुळे स्थगिती मिळाली आहे. दाेन्ही जिल्ह्यातील अशा एकूण ४५ जागांना फटका बसला आहे. त्यात गाेंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, कोकणा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा, नवेगावबांध, सालेकसा तालुक्यातील कारुटोला, तिरोडा तालुक्यातील सेजगाव, चिरेखनी, चिखली, गोंदिया तालुक्यातील घिवारी, सावरी, रतनारा, डोंरगाव, पिंडकेपार, कुडवा, खमारी, गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, हिरडामाली, मुंडीपार, आमगाव तालुक्यातील कट्टीपार, अंजोरा तसेच भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील साखळी, अंबागड, खापा, देव्हाडी, माडगी, मोहाडी तालुक्यातील पाचगाव, मोहगाव देवी, पलोरा, सकोली तालुक्यातील कुंभली, वडद, सानगडी, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, केसलवाडा वाघ, किटाडी, भंडारा तालुक्यातील कोथुर्णा, धारगाव, खोकरला, कोंढी, पहेला, पवनी तालुक्यातील चिचाळ, पिंपळगाव, कोदुर्ली, लाखांदूर तालुक्यातील मासळ, भागडी, पिंपळगाव को. या क्षेत्रातील निवडणूक स्थगित झालेली आहे.