लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : समन्वयाने व पारदर्शकतेने निवडणुकीला सामोरे गेल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वृध्दींगत होतो. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक या लोकशाहीची खरी परीक्षा असतात. काही अडचण असल्यास निवडणूक निरिक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना निवडणूक मुख्य निरिक्षक पार्थसारथी मिश्रा यांनी दिल्या.शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.या बैठकिला पोलीस निवडणूक निरिक्षक सचिन बादशाह, निवडणूक खर्च निरिक्षक नाकिडी सृजनकुमार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जगताप, डॉ. अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्णानाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार आदी यावेळी उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेली तयार समाधानकारक आहे. प्रत्येक यंत्रणेने काम करणे आवश्यक असून एकमेकांशी संवाद ठेवून काम करणे आवश्यक आहे.
निवडणुका म्हणजे लोकशाहीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:45 AM
समन्वयाने व पारदर्शकतेने निवडणुकीला सामोरे गेल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वृध्दींगत होतो. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक या लोकशाहीची खरी परीक्षा असतात.
ठळक मुद्देपार्थसारथी मिश्रा : आढावा बैठक