शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

थकबाकीनंतरही लढविली संचालकांनी निवडणूक

By admin | Published: April 11, 2017 12:35 AM

लाखनी येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे.

कुंपनच शेत खाते तेव्हा : प्रकरण लाखनी येथील अक्षय पतसंस्थेचेप्रशांत देसाई भंडारालाखनी येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. संस्थेच्या अध्यक्षासह अन्य तीन संचालकांनी केवळ ६ टक्के व्याजदराने कर्जाची उचल केली. कर्ज थकीत असतानाही नियमबाह्य रित्या निवडणूक लढण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.लाखनी येथील अक्षय नागरी पतसंस्थेत ३३ लाख ९९ हजार ३७० रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह आठ जणांविरुध्द लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरु असून पोलिसांनी पतसंस्थेचे कागदपत्र ताब्यात घेतले आहे. यात संस्थेचे अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव जगन्नाथ वरकड, उपाध्यक्ष उमराव बावनकुळे, कार्यवाह देवाजी पडोळे, सहकार्यवाह देवराम चाचेरे यांनी आणखी एक घोटाळा केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पदाचा गैरवापर करुन त्या चौघांनी संस्थेतून २००४ मध्ये कर्जाची उचल केली. या कर्जाची व्याज आकारणी त्यांनी केवळ ६ टक्के केली. यामुळे पतसंस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. ही लेखापरिक्षणात पुढे आली. याबाबत तत्कालीन लेखापरिक्षक यांनी परिक्षण अहवालानंतर सदर कर्ज प्रक्रिया चुकीची असल्याचे संचालकांना निदर्शनात आणून दिले होते. मात्र, संचालकांनी ते उडवून लावत. सर्व नियमबाह्य असल्याचे सांगितले होते. दरम्यान लाखनी पोलिसांनी अक्षय पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने संस्थेच्या स्थापनेपासूनचे कागदपत्र जप्त केले आहे. यात आता संस्थेने केलेल्या नोकरभरतीसह घेतलेले सर्व ठराव यांचा ही खडाणखडा तपास पोलीस करीत आहे. यात आणखी काही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सहा टक्के व्याजाने घेतले कर्जसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव वरकड यांनी २००४ मध्ये ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर उपाध्यक्ष उत्तमराव बावनकुळे यांनी ५ लाखांचे, कार्यवाह देवाजी पडोळे यांनी ५ लाखांचे तर सहकार्यवाह देवराम चाचेरे यांनी ५ लाखांच्या कर्जाची उचल केली. मात्र हे कर्ज केवळ सहा टक्के व्याज दराने घेतल्याचा गंभीर प्रकार आता उघडकीस आला आहे.सर्वसाधारण ग्राहकांची दिशाभूलपतसंस्थेच्या सभासदांना कर्जाची उचल करायची झाल्यास त्यांना १३ टक्के प्रचलीत व्याज दर द्यावे लागतात. ग्राहक व अन्य सभासदांकडून एकीकडे १३ टक्क्यांची कर्ज वसुली करण्यात येत असतांना संचालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी संस्थेला आर्थिक फटका देत केवळ ६ टक्के व्याजदराने कर्जाची उचल केली. हे नियमबाह्य असल्याची बाब उघडकीस आली आहे.नियम डावलून लढली निवडणूकअक्षय पतसंस्थेचे हे संचालक संस्थापक संचालक आहेत. अध्यक्ष वरकड, उपाध्यक्ष बावनकुळे, कार्यवाह पडोळे, सहकार्यवाह चाचेरे यांनी संस्थेतून २२ लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर याची परतफेड करण्यात आली नाही. सदर संचालक हे पतसंस्थेचे थकीत कर्जदार ठरले. दरम्यान पतसंस्थेची निवडणूक आली. त्यात हे चारही संचालक थकीत कर्जदार असल्याने निवडणूक लढू शकत नाही असा उपनिबंधक कार्यालयाचा नियम आहे. मात्र या नियमाला न जुमानता त्यांनी नियमबाह्यरित्या निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांना साथ देणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह संचालकांवरही आता संशयाची सुई बढावली आहे.खाते बंद करण्याची ठेवीदारांची मागणी पतसंस्थेच्या विश्वासर्हतेवर आता घोटाळ्यांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी पतसंस्थेमधील त्यांची खाती बंद करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. संचालकांनी नियम पायदळी तुडवत स्वत:चे स्वार्थ साधल्याचा घोटाळ्यानंतर आणखी काही घोटाळे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान खातेदारांच्या मागणीनुसार संचालक मंडळ आता जेरीस आले आहे.