ठळक मुद्देवीज पुरवठा ठप्प : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
<p>लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : कोंढा परिसरात दहा दिवसापुर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामध्ये ५० वर्षाचे सावरीचे झाड वीज रोहित्रावर पडले. परंतु अजूनही वीज पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाची विल्हेवाट तसेच तुटलेल्या तारा न उचलल्याने शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.वादळी पावसात झाडे, विजेचे खांब व तारा तुटल्या आहेत. त्या दहा दिवसापासून शेतात पडून आहेत. डॉ. शतरंज गजभिये यांच्या शेतातील बांधावर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्यासाठी जनित्र ठेवले होते. वादळात जनित्रावर ५० वर्षापुर्वीचे सावरीचे झाड पडले. वीजेच्या तारा तुटल्या खांब शेतात पूर्ण झुकले. तेव्हा कृषीपंपाच्या जोडणीला असलेल्या तारा, खांब तुटल्याने त्याची योग्य विल्हेवाट वीज कर्मचाºयांनी लावणे आवश्यक होते. परंतु दहा दिवसापासून खांब, तारा शेतात पडून आहेत.त्या पूर्ववत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच जीवंत वीज तारांना स्पर्श होवून मोठा धोका निर्माण होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तरी कोसळलेल्या सावरीच्या झाडाची तोडून जनित्र सुस्थित लावणे तसचे झुकलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.विद्युत रोहित्रावर कोसळले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:41 PM