लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सेंट्रींगची सळाख उचलताना विजेच्या ११ केव्हीच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील जे.के. प्लाझाजवळ घडली. ओम ऊर्फ टिल्लू खंगार रा.वरठी असे मृत मजुराचे नाव आहे.मुख्य बाजारओळीत असलेल्या खंडवा फॅशन दुकानाला लागून एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी अनेक मजूर सकाळीच कामावर आले होते. त्यात खंगार हेसुद्धा होते. या इमारतीवर चढण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या नसल्यामुळे लाकडाने तयार केलेल्या पायरीच्या आधाराने या इमारतीवर चढावे लागत होते. दरम्यान आज सकाळपासूनच पाऊस सुरू असून त्याठिकाणी ओलावा होता. सेंट्रींगच्या कामासाठी खंगार हे दुसºया माळ्यावर चढले होते. तिथे पोहचल्यावर त्यांनी लोखंडी सळाखी ओढण्याचे काम करीत होता.त्यापैकी एक सळाख वाहून नेताना ११ केव्हीच्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने त्याचा विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला. यावेळी खंगार हे घटनास्थळी मृत पावल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर या दुकानाच्या सभोवताल नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलीस ठाण्याची चमू आणि वीज वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता पराग फटे हे चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी मृत मजुराच्या कुटुंबीयांना भ्रमणध्वनीने घटनेची माहिती देण्यात आली.
विद्युत धक्क्याने मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:45 AM
सेंट्रींगची सळाख उचलताना विजेच्या ११ केव्हीच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील जे.के. प्लाझाजवळ घडली. ओम ऊर्फ टिल्लू खंगार रा.वरठी असे मृत मजुराचे नाव आहे.
ठळक मुद्देभंडारा येथील घटना : एक मजूर जखमी