शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

उन्हाळ्यात वीज टिकेना, त्यात डासांची भुणभुणही झोपू देईना !

By युवराज गोमास | Published: March 28, 2024 6:46 PM

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. कडक उन्हाचा चटका सर्वांना बसतो आहे. पंखा, कुलर, एसीशिवाय झोपच येत नाही; परंतु, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत असंतोषाची भावना आहे.

भंडारा : जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांची संख्या २ लाख ८२ हजार ९८ इतकी आहे; परंतु, विद्युत विभागाचा मनमर्जी कारभार सुरू असल्याची परिस्थिती ऐन उन्हाळ्यात दिसून येत आहे. विद्युत विभागाचा सर्वाधिक त्रास शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येत आहे. दिवस-रात्र केव्हाही विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उकाडा असह्य होत आहे. त्याच डासांचा प्रकोप वाढल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. सर्दी, ताप, खोकला व न्यूमोनियाचे आजार बळावले आहेत.

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. कडक उन्हाचा चटका सर्वांना बसतो आहे. पंखा, कुलर, एसीशिवाय झोपच येत नाही; परंतु, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत असंतोषाची भावना आहे. जिल्ह्यात वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने उकाडा असह्य होत असतो. शिवाय बत्ती गुल होताचा डास हल्ला चढवीत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. तासाभराच्या अंतराने, तर कधी अर्ध्या तासाच्या अंतराने विद्युतपुरवठा खंडित केला जात असल्याने व्यावसायिकही बेजार आहेत. दिवसभर काबाडकष्ट उपसून रात्री सुखाची झोप घ्यावी तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

रात्री-बेरात्री होतेय बत्ती गुलजिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडित वीजपुरवठ्याने हाहाकार उडत आहे. खंडित वीजपुरवठ्याचा प्रकार आठवड्याभरापासून सुरू आहे. अद्याप भारनियमन सुरू झालेले नाही; परंतु, अवेळी बंद होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बॉक्स

बिल वाढले, सुविधा का नाही?

वीज महामंडळाने महिनाभरात थकीत बिलासाठी २५५९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. यात घरगुती वीज ग्राहकांची संख्या सर्वाधिक म्हणजे २०९५ इतकी आहे; तर व्यावसायिक ग्राहकांची संख्या ४०३ असून औद्योगिक ग्राहकांची संख्या ६१ आहे. महावितरण ज्याप्रमाणे वसुलीकडे लक्ष घालते, त्याप्रमाणे वाढलेल्या बिलांच्या समस्येकडे व सुविधांकडे लक्ष का देत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

बॉक्स

उपविभागनिहाय घरगुती ग्राहकउपविभाग ग्राहक संख्या

भंडारा ग्रामीण ३९१३८भंडारा शहर ३१५९६

मोहाडी ३३६२९पवनी ३८०२९

तुमसर ४८८५२लाखांदूर २६५११

लाखनी ३०७४९साकोली ३३५९४

एकूण २,८२,०९८

डासांची पिल्लावळ वाढीस

शहरांसह ग्रामीण भागात भर उन्हाळ्यात डासांची पैदास वाढीस लागली आहे. रात्रीला डासांच्या झुंडी आक्रमण करीत असल्याने सध्या पंख्यात झोपणे कठीण होत आहे. नाल्या व गटारांमध्ये साचलेल्या घाणीत डासांची पैदास वाढीस लागली आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष देत औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.