शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा : तहसीलदार यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी क्षेत्रातील नागरिकांना विजेचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याची सुरवात होऊनही आतापर्यंत उपकरणांची निगा व दुरुस्ती न झाल्यामुळे विद्युतपुरवठा १० ते १५ तास खंडीत होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांना यातून सुटका करुन सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.देव्हाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांना नियमित पाणीपुरवठा करीत नसून ते आठवड्यातून तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी याबाबत जाब विचारला असता, पाण्याची पातळी कमी झाली असून ग्रामवासींयाना नियमित पाणीपुरवठा करु शकत नाही, असे उत्तर पदाधिकाऱ्यांकडून मिळत आहे. देव्हाडी गावातील नेहरु वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात कुकुटपालन सुरु असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी कुकुट पालन बंद करुन गावाचा बाहेर नेण्याकरिता पत्र सुध्दा दिला होता. ग्रामपंचायतमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता व ठराव मंजूर झाला होता परंतु त्या ठरावावर ग्रामपंचायत अजूनही काही कारवाही केली नाही. या कुकुट पालनावर ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले आहे. देव्हाडी क्षेत्रातील लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध शिवसेना खपवून घेणार नाही. या विषयावर ६ जुलै रोजी शिवसेनेने तुमसर रोड येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. तहसिलदार गजेंद्र बालपांडे यांना निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, अमित मेश्राम, नितीन सेलोकर, जगदीश त्रिभुनकर, किशोर यादव, कृपाशंकर डहरवाल, राजू डहाके, पंकज चोपकर यासह यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.
विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त
By admin | Published: July 05, 2017 12:59 AM