लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : मागील अनेक दिवसापासून गर्रा बघेडा,सुसूरडोह, आसलपाणी येथे दारू बंदी होती परंतु आता पोलिसाच्या आशीवार्दाने दारूविक्रेते सर्रास मोहफुलदारू विकत आहेत. दारू पकडल्या नंतरीही पुन्हा दारू जोमात विकतात. पोलिस ठाण्यात निवेदन दिल्यानंतरही दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.गर्राबघेडा, सुसूरडोह (पुनर्रवसन) आसलपाणी, मोठागाव, कारली, झंडीटोला गाळकाभोंगा येथे सर्रास मूहफुल दारू विक्री सुरू असल्यामुळे नागरिक तसेच विध्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी गेले आहेत. गावात अशांतता निर्माण होत आहे. अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहे.पोलिसांची कारवाई दिसत नसल्याने ही बाब गांभिर्याने घेऊन येथील सरपंच, उपसरपंच व महिला मंडळीनी गोबरवाही, तुमसर पोलिस स्टेशन तसेच आपकारी विभाग भंडारा येथे निवेदन दिला आहे परंतु गावात दारू बंदी न होता उलट पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर दारू विक्री जोमात सुरू आहे.महिला वर्ग दारू पकडून पोलिसांना बोलवतात परंतु दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’ दारू विकणे सुरूच असते विक्रत्यावर कोणताही असर होत नाही यांच्यावर कारवाही होतो की नाही पोलिसाबरोबर मिलीभगत तर नाही असे सवाल असून आरोप येथील महिलांचा आहे. पोलिसांचा भय दारूविक्रेत्यांना राहिलेला नाही. त्यामुळे पोलीस काय करणार? असे बोलून महिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात. ही गावे जंगललगत असल्याने संपूर्ण दारू अड्डे गर्रा बघेडा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आहेत. मौल्यवान वृक्षांची अवैध कटाई करून दारू अड्डे चालवितात यात वनविभागाचेही दुर्लक्ष आहे.कदाचीत दारुबंदीकरिता पोलिसांची साथ मिळाली नाही तर आंदोलन करण्याविषयी सरपंच बघेडा प्रतिमा अशोक ठाकूर, उपसरपंच गोपीचंद गायकवाड, सुसूरडोहच्या सरपंच संगीता धुर्वे, उपसरपंच रोहिदास मरसर्कोल्हे, आसलपाणीचे सरपंच मोहन गौपाले, उपसरपंच विद्या कोकुडे व समस्त महिलांकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दारूबंदीचा विषय गांभिर्यानी घेण्याची गरज आहे
दारू बंदीकरीता महिलांनी पुकारला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 10:24 PM
दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.
ठळक मुद्देगर्रा, बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील प्रकार : ग्रामपंचायतीचा पुढाकार, पोलिसांचे दुर्लक्ष