लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे.याकरिता जिल्ह्यात युवा बेरोजगार संघटना निर्माण केली.व याच संघटने मार्फत शासनाने या बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती करून द्यावी ही मागणी घेऊन जिल्हा कचेरीवर १२ सप्टेंबर रोजी भव्य धडक मोर्चा भारतीय युवा बेरोजगार संघटना च्या वतीने आयोजित केला असल्याचे संस्थापक बालू चून्ने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.भंडारा जिल्ह्यातील तरुण बेरोजगार युवकांना बेरोजगारांच्या संधी शासनाने उपलब्ध करून द्यावे, यासाठी भारतीय युवा बेरोजगार संघटना निर्माण केली. या संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात येणार आहे. या बेरोजगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बेरोजगार युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता भव्य धडक मोर्चा जिल्हा काचेरीवर आयोजित केला आहे. या वेळी बेरोजगारांच्या मागण्यांमध्ये व्हिडिओकॉन, अशोक लेलँड, सनफ्लॅग, अदानी येथे बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे, शासकीय व निमशासकीय कार्यालयात बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने काम द्यावे, मुद्रा लोन गरजू बेरोजगारांना द्यावे, औद्योगिकक्षेत्र वाढविण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर विध्यार्थ्यांना मानधन देण्यात यावे,भेल प्रकल्पग्रत शेतकरी मुलांना प्रमाणपत्र देण्यात यावे शासकीय रिक्त पदे भरावे, आदी मागण्या घेऊन बेरोजगार युवक लाखोंच्या संख्येत एल्गार पुकारणार आहेत.या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक बाळू चुन्ने, कल्याणी भुरे, किशोर पंचभाई, डॉ. अजय तुमसरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.या मोर्चात युवा बेरोजगारांनी उपस्थिती दर्शवून आपले नाव नोंदवून घावे असे यावेळी लाखांदूर येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय युवा बेरोजगार संघटनेचे संस्थापक बाळू चुन्ने, डॉ.मोहन राऊत, शिलमंजू सिंव्हगडे, प्रकाश हेमने, बाबुराव भिसे, ऋषी गोमासे, विजय देव्हारे, किरण सातव, दीपक चिमनकार, टोमेश्वर पंचभाई , सुधाकर चेटुले यांनी केले. यावेळी राकेश राऊत, योगेश महावाडे किशोर बागमारे, रितेश झोडे, संदीप राऊत आदी उपस्थित होते.
तरुणांचा रोजगारासाठी जिल्हा कचेरीवर एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:13 AM
युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे.याकरिता जिल्ह्यात युवा बेरोजगार संघटना निर्माण केली.व याच संघटने मार्फत शासनाने या बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती करून द्यावी....
ठळक मुद्देपत्रकार परिषदेत माहिती : बेरोजगार युवक संघटनेने घेतला पुढाकार