लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अश्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भंडारा शहरासह जिल्ह्यातील गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरातील वैनगंगा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी वैनगंगा नदीसह जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाला अनेकांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. वैनगंगा नदीत विसर्जनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत भावीक बाप्पाला घेवून येत होते. सार्वजनिक आणि घरगुती गणेशांची मिरवणुक वैनगंगेच्या तिरावर पोहचताच त्याठिकाणी आरती करुन बाप्पाला निरोप दिला जात होता. पुरुषांसोबतच महिला आणि लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. दुपारी ४ नंतर विसर्जन करण्यासाठी वैनगंगा तिरावर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.जुन्या वनउपज नाक्याजवळ बॅरिकेट्स लावून वाहने अडविण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना बाप्पाला आपल्या डोक्यावरुन वैनगंगेपर्यंत न्यावे लागत होते. विशेष म्हणजे बॅरिकेटपासून वैनगंगेच्या पात्रापर्यंत असलेल्या मार्गात प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधारातून भाविक जात होते.कोणतीही अप्रीय घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तासह इलेक्ट्रानिक्स बोट, पट्टीचे पोहणारे कर्मचारी, हवेने भरलेले रबरी टयूब आदी व्यवस्था करण्यात आली होती. शहरात विसर्जन मिरवणूकीदरम्यान कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे भंडाराचा राजा आणि गणेशपूरचा राजा या मंडळाचे विसर्जन पोलिसांनी ठरवून दिलेल्या दिवशी होणार आहे.भंडारा शहरात सोबतच जिल्ह्यातही बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पवनी शहरात विठूमाई गणेश मंडळ, मंगलमुर्ती गणेश मंडळ, प्रगती गणेशउत्सव मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, प्रियदर्शनी गणेशउत्सव यासह अनेक घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, मोहाडी आदी तालुक्यासह गावागावात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.डीजेवर बंदीने तरुणाईचा उत्साह कमीदरवर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजेवर थिरकणाऱ्या तरुणाईचा उत्साह यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसून आला नाही. न्यायालयाच्या निर्णयाने डीजेवर बंदी घातल्याने जिल्ह्यातील कोणत्याच मंडळाने डीजे लावला नाही. पारंपारिक वाद्य आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. परंतु डीजे नसल्याने उत्साही तरुणांईच्या आनंदावर विरजन पडल्याचे दिसत होते. अनेकजण डीजे नसल्याने या मिरवणुकीतही सहभागी झाले नसल्याचे दिसत होते.
बाप्पाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:28 PM
‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अश्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भंडारा शहरासह जिल्ह्यातील गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरातील वैनगंगा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी वैनगंगा नदीसह जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
ठळक मुद्देजिल्ह्यात शांततेत विसर्जन : गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या