विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा शहराची आढावा बैठक
भंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा शहराची आढावा बैठक कार्यवाह पुरुषोत्तम लांजेवार यांच्या निवासस्थानी तालुकाध्यक्ष अनिल कापटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संघटन शक्ती बळकट करण्याच्या दृष्टीने शाळा तिथे विमाशि संघाची विचारसरणी पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमाशिच्या आढावा बैठकीत २ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या विमाशिच्या तालुका व भंडारा शहराच्या संयुक्त अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच विमाशी संघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांचा प्रचार दौरा करण्याबाबत रणनीती तयार करण्यात आली. यासोबतच शाळा तेथे विमाशी अभियान राबवून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विमाशि संघाची विचारसरणी पोहोचविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी टेकचंद मारबते, चंद्रशेखर रहांगडाले,धीरज बांते, वैरागडे, तालुकाध्यक्ष जागेश्वर मेश्राम कार्यवाह श्याम घावळ, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी बारस्कर, मोरेश्वर वझाडे, पृथ्वी जांबुलकर, मनोज अंबादे, पराग शेंडे, जुबेर कुरेशी, देवगडे, सुधाकर धाडसे उपस्थित होते.