अप-डाऊनमुळे काम प्रभावित : अनेक अधिकारी मुख्यालयी गैरहजरभंडारा : जिल्ह्यातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. त्यात शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणखीनच त्रस्त झाले आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे कामकाज दिवसेंदिवस रेंगाळत असतात. नागरिकांना एकाच कामासाठी शासकीय कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजवावे लागते. मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. शासकीय कार्यालये अधिकाऱ्यांच्या अप डाउनच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यात पंचायत समिती कार्यालय, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, आयुर्वेदिक दवाखाने, पशु दवाखाने, बांधकाम विभागाचे कार्यालय, वनविभागाचे कार्यालय, वीज वितरण कंपनी कार्यालय, तलाठी कार्यालये, ग्रामसेवक आहेत. ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी आरोग्य कर्मचारी केंद्रप्रमुख आदी कर्मच्याऱ्यांसह अधिकारी असे जवळपास सहा-सात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून कर्तव्य पार पाडावे, असे शासनाचे आदेश आहे. यानुरूप कर्मचारी अधिकाऱ्यांना घरभाडे दिला जातो. मात्र शासनाच्या निकष व आदेशाला ठेंगा दाखवून जिल्ह्यात अनेक कार्यरत अधिकारी, कर्मचारी अप-डाऊन करतात. जिल्ह्याती कार्यालय जवळपास ११ वाजताऐवजी दुपारी १२ ते १ वाजताच सुरू होतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ सकाळी १०.३० वाजता कार्यालय सुरू करून बसला राहतो. इतर कर्मचारी १२ वाजता येतात आणि ३ वाजता निघून जातात. हीच परीस्थिती ग्रामपंचायत कार्यालय व शाळांचीही आहे. शाळामध्ये अंतर्गत अँडजेस्टमेंट करूनही गैरहजेरी असते. कृषी आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी नेहमी दौऱ्यावर असल्याचे सांगतात. यामुळे अनेकाांंना विविध शासकिय कार्यालयीन कामकाजाकरिता त्रास सहन करावा लागतो. (नगर प्रतिनिधी)
मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला कर्मचाऱ्यांचा ठेंगा
By admin | Published: November 22, 2015 12:33 AM