आॅनलाईन लोकमतलाखनी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र भंडारा, शिवणकर व दिव्यांग मित्र परिवार, युनिक स्पर्धा परीक्षा वर्ग लाखनतर्फे शासकीय धोरणानुसार जिल्हा कौशल्य व विकास रोजगार मेळावा पार पडला. यात परिसरातील ३०० युवक-युवतींना रोजगाराची संधी प्राप्त झाली.या मेळाव्याचे उद्घाटन प्रशांत शिवनकर व जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे अध्यक्ष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र संचालक पंकज खांडेकर, सुधन्वा चेटूले आदी उपस्थित होते. या मेळाव्यात लाखनी, भंडारा, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील कंपनीचे प्रतीनिधी व अधिकारी उपस्थित होते. यात युवकांची प्रत्यक्ष चर्चा करून रोजगारबाबत विचारणा करण्यात आली. तसेच योग्यतेनुसार जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये योग्यतेनुसार रोजगाराची संधी या युवकांना देण्यात आली आहे, असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात यावे, असा सुरही येथे ऐकावयास मिळाला संचालन पवन खांडेकर यांनी तर आभार विक्की मेश्राम यांनी मानले. मेळाव्याला जिल्ह्यातील शेकडो युवक-युवती सहभागी झाले होते.
लाखनी येथे रोजगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:15 PM
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र भंडारा, शिवणकर व दिव्यांग मित्र परिवार, युनिक स्पर्धा परीक्षा वर्ग लाखनतर्फे शासकीय धोरणानुसार जिल्हा कौशल्य व विकास रोजगार मेळावा पार पडला.
ठळक मुद्दे३०० युवकांना लाभ : जिल्ह्यातील बेरोजगारांचा समावेश