लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अदानी फाऊंडेशन मार्फत तिरोडा परिसरातील गावांमधील महिला बचत गटांसाठी मशरुम उत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. बचत गटांना मशरूमचे बीज (स्पॉन) उपलब्ध व्हावे यासाठी मशरूम स्पॉन प्रॉडक्शन सेंटरही सुरू केले असून नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले.अदानी फाऊंडेशनकडून परिसरातील गावांमधील बचत गटातील महिलांसाठी मशरूम उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. महिला बचत गटातील सदस्य पॅडीस्ट्रॉ मशरूम आणि आॅरगेटर मशरुमचे उत्पादन घेत आहेत. परंतु त्यांना मशरुम उत्पादनासाठी लागणारे मशरुम स्पॉन (बिज) ओडिशा राज्यातून अथवा पुणे येथून मागावावे लागते. त्यासाठी बराच खर्च व वेळ लागत होता आणि उत्पादनात व्यत्यय येत होता. अडचणीवर मात करण्यासाठी अदानी फाऊंडेशनद्वारे नुकतेच मशरुम स्पॉन प्रॉडक्शन सेंटर सुरु करण्यात आले आहे. सदर केंद्राचे उद्घाटन अदानी पावर महाराष्टÑ लिमिटेडचे स्टेशन हेड सी.पी. साहू यांच्या हस्ते करण्यात आले. सदर केंद्रात मशरुम स्पॉनची निर्मिती व अल्प दरात विक्री बचत गटाच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण व प्रक्रिया या सुविधा देखील उपलब्ध आहेत. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील मशरुम उत्पादन देणाऱ्या गटांना होईल.या उपक्रमासाठी मानव विकास शिक्षण विभागाचे आर्थिक सहाय्य मिळत असल्याचे अदानी फाऊंडेशनचे युनिट सीएसआर हेड नितीन शिराळकर यांनी सांगितले.
बचतगटांना मिळणार रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 11:46 PM
अदानी फाऊंडेशन मार्फत तिरोडा परिसरातील गावांमधील महिला बचत गटांसाठी मशरुम उत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. बचत गटांना मशरूमचे बीज (स्पॉन) उपलब्ध व्हावे यासाठी मशरूम स्पॉन प्रॉडक्शन सेंटरही सुरू केले असून नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले.
ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा उपक्रम : मशरुम उत्पादन प्रकल्प