लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : नवेगाव (पाले) येथे गोसे प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर शासकीय जागेवर अतिक्रमण करून एका कर्मचाºयाने अवैध बांधकाम सुरु केले होते. हे आजूबाजूच्या लोकांच्या तसेच ग्रामपंचायत नवेगाव (पाले) यांच्या लक्षात येताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पवनी व तहसीलदार पवनी यांना लेखी तक्रार करून सूचना दिली होती. प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमण असल्याने याची त्वरीत दखल घेत बांधकाम विभाग, पवनी यांनी तहसीलदार पवनी, अड्याळ पोलिसांच्या संरक्षणात अवैध बांधकाम पाडले.भंडारा गोसे या प्रमुख जिल्हा क्र. ३५ वर नवेगाव (पाले) येथील नखाते कुटुंबियानी अतिक्रमण केले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकºयांना शेतावर जाण्यास अडचण निर्माण होऊन शेतकºयांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला. तसेच अतिक्रमणधारक स्वत: शासकीय कर्मचारी असून त्यांनी अतिक्रमण केलेल्या प्रमुख जिल्हा मार्गालगत सिमेंट काँक्रेटचे बांधकाम सुरु केले होते. याची तक्रार ग्रामपंचायतने सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पवनी, तहसीलदार पवनी, पोलीस स्टेशन अड्याळ यांना दिली होती.तसेच शेतकºयांचा शेतात येण्याजाण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांनी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत यांना लेखी तक्रारीद्वारे कळविले होते. मात्र अतिक्रमणधारकांनी मुजोरीने कुणाचे न ऐकता बांधकाम सुरुच ठेवले. शेवटी ग्रामपंचायतने बांधकाम विभाग यांना पत्राद्वारे याची माहिती दिली. सहाय्यक अभियंता सावरकर यांनी तात्काळ याची दखल घेत त्यांनी तहसीलदार पवनी यांना पत्र देऊन अतिक्रमण हटविण्यास विनंती केली. नायब तहसीलदार कांबळे, नवेगाव (पाले) येथील सरपंच बारसागडे, उपसरपंच कोहपरे, पोलीस पाटील विलास कोहपरे व अड्याळ पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सहाय्यक अभियंता सावरकर व त्यांच्या कर्मचाºयांनी मजूर, जेसीबी मशिनच्या सहाय्याने पक्के बांधकाम जमीनदोस्त केले. अशाप्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाºया लोकांचे धाबे दणाणले आहे.
गोसे फाट्यावरील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:26 PM
नवेगाव (पाले) येथे गोसे प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर शासकीय जागेवर अतिक्रमण करून एका कर्मचाºयाने अवैध बांधकाम सुरु केले होते.
ठळक मुद्देप्रशासनाची संयुक्त कारवाई: शासकीय कर्मचाºयाचे रस्त्यालगत अवैध बांधकाम